Srilila video : पापाराझींच्या कॅमेऱ्यात ‘तो’ क्षण झाला कैद! प्रसिद्ध अभिनेत्री चर्चेत; पुष्पा २ मध्ये केलंय काम, व्हिडीओ पाहा…
Srilila video : दाक्षिणात्य अभिनेत्री श्रीलीलाचा एक व्हिडीओ सोशल मीडियावर तुफान व्हायरल होत आहे.
Srilila video : दाक्षिणात्य अभिनेत्री श्रीलीलाचा एक व्हिडीओ सोशल मीडियावर तुफान व्हायरल होत आहे. त्यामुळे ती पुन्हा एकदा चर्चेत आली आहे. अभिनेत्रीचा देशभरात मोठा चाहतावर्ग आहे. पुष्पा २ मधील किसिक या गाण्यामुळे ती चर्चेत आली. तिला या गाण्याने मोठी लोकप्रियता मिळवून दिली.
लवकरच श्रीलीला बॅालीवूडमधील एका मोठ्या चित्रपटामध्ये दिसणार आहे. श्रीलीला केवळ एक अभिनेत्रीच नाही तर एक डॉक्टर देखील आहे. तिने नुकतीच तिची एमबीबीएस पदवी प्राप्त केली आहे. तिच्या दीक्षांत समारंभातील व्हिडिओ आणि फोटो व्हायरल झाले आहेत. चाहते आणि सेलिब्रिटींनी तिला एमबीबीएस पदवी मिळाल्याबद्दल अभिनंदन केले आहे.
श्रीलीला तिची एमबीबीएस पदवी घेऊन परतत होती. विमानतळावरून बाहेर पडताना तिथे उपस्थित असलेल्या पापाराझींनी तिला कॅमेऱ्यात कैद केले. श्रीलाचा लूक पाहण्यासारखा होता. तिने गडद लाल रंगाचा फ्लोरल प्रिंट ड्रेस वेअर केला होता. या आउटफिटमध्ये ती खूपच सुंदर दिसत होती. पण अभिनेत्री तिच्या गाडीत बसण्यासाठी वळताच, सर्वांचे लक्ष तिच्या ड्रेसच्या मागच्या बाजूला असलेल्या टॅगकडे गेले, हा क्षण पापाराझींच्या कॅमेऱ्यात कैद झाला.
View this post on Instagram
श्रीलीलाचा हा व्हिडीओ सोशल मीडियावर व्हायरल होत आहे. या व्हिडीओवर नेटकऱ्यांनी कमेंट केल्या आहेत, “हे काय आहे मॅडम… तुम्ही विमानतळावर ड्रेस खरेदी केला आणि टॅग काढायला विसरलात?” असे एका नेटकऱ्याने म्हटले आहे. तर दुसऱ्याने लिहिले, “असे दिसते की फॅशन डिझायनरने श्रीलीलाला टॅग काढू नका असे सांगितले होते, म्हणूनच तो अजूनही तिथेच आहे. ”
एमबीबीएस पदवी केली प्राप्त
अभिनयाच्या झगमगाट आणि ग्लॅमरच्या दुनियेत अभिनेत्री श्रीलीलाने तिचे वैद्यकीय शिक्षण पूर्ण करत एमबीबीएसची पदवी प्राप्त केली आहे. अभिनेत्रीने तिच्या पदवीप्रदान समारंभाचे सुंदर फोटो इंस्टाग्रामवर शेअर केले आहेत. या फोटोंमध्ये श्रीला तिच्या कुटुंब आणि मित्रांसह तिच्या आयुष्यातील हा महत्त्वाचा क्षण साजरा करताना दिसत आहे.
हेही वाचा : Nikki And Arbaaz : ‘आमचे धर्म वेगळे, वडिलांचा विरोध…’; अरबाजने प्रपोज करताच निक्कीला अश्रु अनावर





