Nikki And Arbaaz : ‘आमचे धर्म वेगळे, वडिलांचा विरोध…’; अरबाजने प्रपोज करताच निक्कीला अश्रु अनावर
Nikki And Arbaaz : ‘The 50’ शोमध्ये अरबाजने निक्कीला प्रपोज केलं, त्यावेळी तिला अश्रु अनावर होतात.
Nikki And Arbaaz : निक्की तांबोळी आणि अरबाज पटेल यांच्या लव्हस्टोरीची सुरुवात ‘बिग बॉस मराठी’च्या पाचव्या सीझनमधून झाली. या सीझननंतर देखील दोघे एकत्र आहेत. सध्या दोघेही ‘The 50’ शोमध्ये पाहायला मिळत आहे.
या शोदरम्यान, अरबाजने निक्कीला प्रपोज केलं आहे. यावेळी निक्की तिच्या वडिलांना दोघांचे नातं मान्य नसल्याचे सांगते, त्यावेळी तिला अश्रू अनावर झाले होते. सध्या तिचा हा व्हिडिओ सोशल मीडियावर तुफान व्हायरल होत आहे.
अरबाज निक्कीला प्रपोज करताना म्हणाला, “आम्ही आजवर एकमेकांना प्रपोज केलेलं नाहीये किंवा असं जाहीरपणे आमचं नातं मान्यही केलं नव्हतं. कलर्स वाहिनीच्या ‘बिग बॉस मराठी’ शोमध्ये आमची ओळख झाली, आम्ही भेटलो आणि आता कलर्सच्या या ‘The 50’ शोमध्ये मला निक्कीला प्रपोज करण्याची संधी मिळाली.
निक्की तू खूप स्ट्राँग आहेस, मी सुद्धा स्ट्राँग आहे पण, माझ्या रागावर माझं नियंत्रण नव्हतं. जेव्हा मी तुला पाहतो तेव्हा मी आपोआप शांत होतो. आय लव्ह यू निक्की, माझं तुझ्यावर खूप प्रेम आहे.” अरबाजने प्रपोज केल्यावर निक्कीने होकार दिला आणि तिला अश्रू अनावर होतात.
View this post on Instagram
यावर निक्की म्हणते, “या क्षणाची मी आतुरतेने वाट पाहिली होती. पण, मला थोडी भीती वाटत होती कारण, आम्हा दोघांचे धर्म वेगळे आहेत. गेल्या दीड वर्षांपासून आम्ही एकत्र आहोत पण, माझ्या वडिलांनी हे नातं अजूनही स्वीकारलेलं नाही. मी माझ्या वडिलांच्या विरोधात जाऊन हे नातं निभावण्याचा निर्णय घेतला होता.
कारण, मी माझ्या वडिलांच्या इच्छेविरोधात हे करत आहे कारण माझ्या आईने मला कायम हेच शिकवलं की कोणासाठी आपल्या प्रेमाचा त्याग कधीही करायचा नाही. वडिलांचं प्रेम वेगळं आणि एका पार्टनरचं प्रेम वेगळं. माझे वडील आमच्या प्रेमाला समजून घेतील अशी मला आशा आहे. कारण माझं अरबाजवर खूप प्रेम आहे.” Nikki And Arbaaz :
दरम्यान, निक्की-अरबाज नेहमी एकमेकांबरोबरचे रोमँटिक फोटो सोशल मीडियावर शेअर करत असतात. त्यामुळे सोशल मीडियावर या जोडीची नेहमीच चर्चा रंगलेली पाहायला मिळते. Nikki And Arbaaz :
हेही वाचा:





