वाराणसी – ओयो या हॉटेल बुकींगच्या ऑनलाईन ऍपकडून हॉटेल रूम बुक करूनही मनालीमध्ये त्रास होत असल्याच्या प्रकरणी ग्राहक विवाद निवारण आयोगाने आपला निर्णय दिला आहे. यामध्ये विरोधी ओयो रूम्सला शारीरिक, मानसिक आणि आर्थिक नुकसान म्हणून एक लाख रुपये देण्याचे आदेश दिले आहेत.
पंचवटी नगर कॉलनी शिवदासपूर येथील रहिवासी असलेल्या कृष्णा भारद्वाज यांनी 14 मार्च 2019 रोजी मनाली येथे ओयो रूम्समधून हॉटेलची खोली ऑनलाइन बुक केली होती. कृष्ण कुमार 24 मार्च 2019 रोजी आपल्या कुटुंबाला भेटायला जाणार होते. कृष्ण कुमार यांनी ऑनलाइन पद्धतीने 4,537 रुपये भरले. यानंतर ते आपल्या कुटुंबासह मनालीला पोहोचले, तेव्हा त्यांच्या नावावर रुम उपलब्ध नसल्याचे सांगण्यात आले. त्यांनी सर्व्हिस सेंटरला फोन केला पण प्रतिसाद मिळाला नाही.
मग दोन दिवस मनाली येथे राहण्यासाठी त्यांना 7,140 रुपये मोजावे लागले. यानंतर त्यांनी ग्राहक मंचात फिर्याद दाखल केली. तक्रारदार आणि विरोधकांनी सादर केलेले पुरावे पाहिल्यानंतर, ग्राहक विवाद निवारण आयोगाने ओयो रूम्सला दोषी ठरवले आणि 19 जून 2023 रोजी एक लाख नऊ हजार 537 रुपये भरण्याचे आदेश दिले.