अकोले, (प्रतिनिधी): आपला शेवटपर्यंतचा जो मित्र आहे तो म्हणजे पुस्तक,म्हणून नेहमी पुस्तके वाचा. पुस्तकात असलेले आदर्श विचार हे आपल्याला नेहमीच प्रेरणादायी असतात, असे प्रतिपादन अकोले नगरपंचायतच्या माजी नगराध्यक्षा सोनाली नाईकवाडी यांनी केले.
प्रवरा विद्यालय, इंदोरी येथे वार्षिक पारितोषिक समारंभ पार पडला. यावेळी कार्यक्रमाच्या अध्यक्षस्थानाहून नाईकवाडी बोलत होत्या. अगस्ती कारखान्याचे माजी उपाध्यक्ष प्रकाश नवले यांनी विद्यार्थ्यांना ज्या क्षेत्रात जाल, त्यात सातत्य ठेवा, असे आवाहन केले. इंदोरी गावचे प्रगतशील शेतकरी पांडुरंग नवले यांनी विद्यालयाच्या प्रगतीबद्दल तसेच विद्यालय होणाऱ्या विविध उपक्रमांबद्दल समाधान व्यक्त केले.
मुख्याध्यापक एस. बी. मालुंजकर यांनी विद्यालयाच विकास कामांचा आराखडा मांडला. यावेळी अॅड.आर. डी. नवले, उद्योजक मंगेश नवले यांनी विद्यालयाच्या विकास कामासाठी योग्य ती मदत मिळवून देऊ, अशी ग्वाही दिली. सरपंच मनीषा ठोंबाडे,माजी सरपंच विकास देशमुख, स्कूल कमिटीचे अध्यक्ष रवींद्र देशमुख,संतोष नवले, एकनाथ थोरात ,स्वाती जाधव यांच्या हस्ते विद्यार्थ्यांना विविध कलागुण व नैपुण्याबद्दल पारितोषिक व सन्मान चिन्ह देऊन सन्मानित करण्यात आले. सूत्रसंचालन ज्येष्ठ शिक्षक एस. एम. खारके व प्रसाद देशमुख यांनी केले. आभार शिक्षिका सविता मेहेत्रे यांनी केले.