IPL 2024 (RCB vs GT Match 52) : बंगळुरुची आज गुजरातशी टक्कर, प्लेऑफच्या दृष्टीनं दोघांसाठी महत्वाचा सामना…

IPL 2024 (Royal Challengers Bengaluru vs Gujarat Titans Match 52) : आयपीएल 2024 चा 52 वा सामना रॉयल चॅलेंजर्स बंगळुरू आणि गुजरात टायटन्स यांच्यात आज (शनिवार,4 मे) संध्याकाळी 7.30 वाजता RCB च्या होम ग्राउंडवर म्हणजेच चिन्नास्वामी स्टेडियमवर खेळला जाईल. दोन्ही संघांना प्लेऑफच्या आशा जिवंत ठेवायच्या असतील तर त्यांना हा सामना कोणत्याही किंमतीत जिंकावाच लागेल. जर हरले तर प्लेऑफचे तिकीट दूरचे स्वप्न असेल.
आयपीएलच्या पॉइंट टेबलवर नजर टाकली तर रॉयल चॅलेंजर्स बंगळुरू शेवटच्या स्थानावर आहे. आरसीबीने आतापर्यंत 10 सामने खेळले असून त्यापैकी 3 जिंकले आहेत आणि 7 गमावले आहेत. आरसीबीच्या खात्यात 6 गुण आहेत. दुसरीकडे, गुजरात टायटन्सची स्थितीही फारशी चांगली नाही. शुभमन गिलच्या नेतृत्वाखाली संघाने 10 पैकी 4 सामने जिंकले तर 6 सामन्यात पराभवाला सामोरे जावे लागले. गुजरातचे 8 गुण आहेत. मात्र, गेल्या सामन्यात आरसीबीने गुजरातचा 9 विकेट्सने एकतर्फी पराभव केला होता. त्या सामन्यात गुजरातचा संघ 200 धावांचा बचाव करू शकला नाही. अशा स्थितीत आरसीबीचे मनोबल उंचावलेले असेल.
यापूर्वी गुजरात टायटन्सचाही सनरायझर्स हैदराबादकडून पराभव झाला होता. म्हणजेच सलग दोन सामने गमावल्यानंतर गुजरातचा संघ आरसीबीशी भिडणार आहे. त्याचवेळी आरसीबीने गुजरात टायटन्सचा पराभव करण्यापूर्वी सनरायझर्स हैदराबादचा पराभव केला होता. म्हणजे सलग दोन सामने जिंकले. त्यामुळे आरसीबीचा आत्मविश्वास वाढलेला असेल.
हेड-टू-हेड रेकाॅर्ड…
गुजरात टायटन्स आणि गुजरात टायटन्स यांच्यात आतापर्यंत 4 सामने झाले आहेत. यापैकी दोघांनी प्रत्येकी दोन सामने जिंकले आहेत. म्हणजे स्पर्धा तुल्यबळ आहे.
IPL 2024 (RR vs SRH Match 50) : हैदराबादमध्ये धावांचा पाऊस, एकाच सामन्यात मोडले अनेक IPL रेकॉर्डस…
आरसीबीची ताकद फलंदाजी…
चेन्नई सुपर किंग्ज आणि दिल्ली कॅपिटल्सच्या नुकत्याच झालेल्या पराभवामुळे RCB आणि गुजरात टायटन्सच्या प्लेऑफच्या आशाही वाढल्या आहेत. शेवटचे दोन्ही सामने जिंकणे हे आरसीबीसाठी चांगले ठरले आहे. विल जॅक आणि कॅमेरॉन ग्रीन रंगात आहेत. जॅकने मागील सामन्यातच गुजरातविरुद्ध शतक झळकावले होते. त्याच वेळी, विराट कोहली आरसीबीच्या फलंदाजीचा मुख्य केंद्र आहे.
आरसीबीची गोलंदाजी ही कमकुवत दुवा…
आयपीएल 2024 मध्ये आरसीबीची सर्वात मोठी कमजोरी म्हणजे त्याची गोलंदाजी. मोहम्मद सिराज आणि लॉकी फर्ग्युसन संपूर्ण मोसमात अपयशी ठरले आहेत. सिराजने 9 सामन्यात 53.83 च्या सरासरीने 6 विकेट घेतल्या आहेत. त्याच वेळी, फर्ग्युसनने केवळ 3 सामने खेळले आहेत आणि 12.70 च्या इकॉनॉमीने धावा दिल्या आहेत. यश दयालने सर्वाधिक 8 विकेट घेतल्या आहेत. आरसीबीला गुजरातविरुद्ध विजय मिळवायचा असेल तर गोलंदाजांना आपली ताकद दाखवावी लागेल.





