Jacob Bethell Injury : पहिल्या क्वलिफायर सामन्यापूर्वी आरसीबीला मोठा धक्का! स्टार खेळाडू दुखापतीमुळे स्पर्धेतून पडला बाहेर
Jacob Bethell Injury : २६ मे रोजी धर्मशाला येथे गुजरात टायटन्सविरुद्ध होणाऱ्या 'क्वालीफायर-१' च्या महामुकाबल्यापूर्वी आरसीबीच्या गोटातून एक अत्यंत वाईट बातमी समोर आली आहे.

Jacob Bethell Injury Update : आयपीएल २०२६ च्या लीग टप्प्यात १४ सामन्यांपैकी ९ सामन्यांत दणदणीत विजय मिळवून गुणतालिकेत अव्वल स्थान पटकावणारा आरसीबीचा संघ सध्या प्ले-ऑफच्या तयारीत व्यस्त आहे. २६ मे रोजी धर्मशाला येथे गुजरात टायटन्सविरुद्ध होणाऱ्या ‘क्वालीफायर-१’ च्या महामुकाबल्यापूर्वी आरसीबीच्या गोटातून एक अत्यंत वाईट आणि चांगली बातमी समोर आली आहे. संघाचा युवा स्फोटक सलामीवीर जॅकब बेथेल दुखापतीमुळे अचानक मायदेशी (इंग्लंड) परतला आहे, ज्यामुळे आरसीबीची चिंता वाढली आहे.
बोटाच्या दुखापतीमुळे बेथेल मायदेशी रवाना –
इंग्लंड आणि वेल्स क्रिकेट बोर्ड (ECB) तसेच आरसीबी संघ व्यवस्थापनाने अधिकृतपणे दिलेल्या माहितीनुसार, जॅकब बेथेलच्या डाव्या हाताच्या मधल्या बोटाला गंभीर दुखापत झाली आहे. या दुखापतीवर पुढील उपचार आणि वैद्यकीय तपासणी करण्यासाठी तो इंग्लंडला परतला आहे. सनरायझर्स हैदराबादविरुद्धच्या सामन्यात तो प्लेइंग इलेव्हनमध्ये का नव्हता, याचे मुख्य कारण आता या दुखापतीच्या रूपाने समोर आले आहे.
🚨 𝙊𝙛𝙛𝙞𝙘𝙞𝙖𝙡 𝘼𝙣𝙣𝙤𝙪𝙣𝙘𝙚𝙢𝙚𝙣𝙩: Jacob Bethell sustained an injury to his left ring finger during our game against PBKS. He will return to England to be assessed ahead of their Test series. ❤️🩹
𝙶𝚎𝚝 𝚠𝚎𝚕𝚕 𝚜𝚘𝚘𝚗, 𝙹𝙱! 🫂 𝚆𝚎’𝚕𝚕 𝚖𝚒𝚜𝚜 𝚑𝚊𝚟𝚒𝚗𝚐 𝚢𝚘𝚞… pic.twitter.com/x6ipurfteA
— Royal Challengers Bengaluru (@RCBTweets) May 23, 2026
बेथेलची ही दुखापत इंग्लंड संघासाठीही डोकेदुखी ठरली आहे, कारण न्यूझीलंडविरुद्ध ४ जूनपासून लॉर्ड्सवर सुरू होणाऱ्या कसोटी मालिकेसाठी त्याचा इंग्लंडच्या संघात समावेश करण्यात आला आहे. आता तो या कसोटी सामन्यापूर्वी फिट होणार की नाही, याचा निर्णय इंग्लंडमधील मेडिकल टीमच्या अहवालानंतर घेतला जाईल.
टेंशन संपलं! फिल साल्टची संघात झाली ‘धमाकेदार’ एन्ट्री
एकीकडे बेथेल बाहेर पडल्यामुळे आरसीबीचे टेन्शन वाढले असतानाच, दुसरीकडे आरसीबीच्या चाहत्यांसाठी एक अत्यंत आनंदाची बातमी समोर आली आहे. संघाचा सर्वात मुख्य आणि स्फोटक सलामीवीर फिल साल्ट आता पूर्णपणे तंदुरुस्त (Fit) झाला आहे. बोटाच्या दुखापतीमुळे फिल साल्ट देखील उपचारासाठी इंग्लंडला गेला होता. मात्र, आता तो पुन्हा एकदा आरसीबीच्या कॅम्पमध्ये दाखल झाला असून त्याने नेट प्रॅक्टिसलाही सुरुवात केली आहे. संघ व्यवस्थापनाने खबरदारी म्हणून त्याला शेवटच्या लीग सामन्यात विश्रांती दिली होती, जेणेकरून प्ले-ऑफच्या सामन्यात कोणताही धोका निर्माण होणार नाही.





