RCB vs GT : नाद करा पण आरसीबीचा कुठं! गुजरातवर मात करत सलग दुसऱ्यांदा फायनलमध्ये एन्ट्री; पाटीदार-डफी ठरले गेमचेंजर
RCB vs GT : यासह आरसीबी सलग दुसऱ्यांदा आणि एकूण पाचव्यांदा फायनलमध्ये प्रवेश केला आहे.

RCB vs GT Royal Challengers Bengaluru Enters IPL 2026 Final : आयपीएल २०२६ च्या पहिल्या ‘क्वालिफायर-१’ सामन्यात गतविजेत्या आरसीबीने आपला दबदबा कायम राखत थेट फायनलमध्ये धडक मारली आहे. धर्मशाला येथे झालेल्या या एकतर्फी सामन्यात गुजरातचा ९२ धावांनी दारूण पराभव केला. यासह आरसीबी सलग दुसऱ्यांदा आणि एकूण पाचव्यांदा फायनलमध्ये प्रवेश केला आहे. कर्णधार रजत पाटीदार आणि जेकब डफी हे आरसीबीच्या या ऐतिहासिक शिल्पकार ठरले.
गुजरातची फलंदाजी पत्त्यासारखी कोसळली –
या सामन्यात आरसीबीने प्रथम फलंदाजी करताना कर्णधार रजत पाटीदारच्या नाबा ९३ धावांच्या जोरावर ५ बाद २५४ धावांचा डोंगर उभारला होता. प्रत्युत्तरात या विशाल लक्ष्याचा पाठलाग करताना गुजरातची फलंदाजी पत्त्यासारखी कोसळली आणि त्यांचा संपूर्ण डाव अवघ्या १९.३ षटकात १६२ धावांवर आटोपला. आरसीबीकडून जेकब डफीने सर्वाधिक ३ विकेट्स घेतल्या. गेल्या हंगामात पंजाबला हरवून पहिल्यांदा चॅम्पियन बनलेल्या आरसीबीकडे आता आपले जेतेपद राखण्याची मोठी संधी आहे.
They are turning this into a habit ❤️#RCB reach their second successive #TATAIPL final and their 5️⃣th overall with a statement 92-run win 👊
Scorecard ▶️ https://t.co/9rs6u5obOw#Qualifier1 | #TheFinalLeap | #RCBvGT pic.twitter.com/JvPhQscTwc
— IndianPremierLeague (@IPL) May 26, 2026
कर्णधार रजत पाटीदारची ९३ धावांची वादळी खेळी!
RCB blaze to a mammoth total in Dharamsala! The highest score in a TATA IPL Playoffs match. 🚨
After Virat Kohli’s powerplay hitting, Rajat Patidar switched on the afterburners in the death overs. 💪
GT will have to pull off a record breaking chase in order to book a spot in… pic.twitter.com/ldsiHkOwjR
— Star Sports (@StarSportsIndia) May 26, 2026
आरसीबीच्या या ऐतिहासिक विजयाची स्क्रिप्ट त्यांच्या फलंदाजांनी लिहिली. किंग विराट कोहलीने २५ चेंडूंत ४३ धावा करत संघाला वेगवान सुरुवात करून दिली. मात्र, त्यानंतर मैदानात आलेल्या कर्णधार रजत पाटीदारने अवघ्या ३३ चेंडूंत ९३ धावांची नाबाद आणि तुफानी खेळी खेळत सामना गुजरातच्या हातातून हिरावून घेतला. पाटीदारने २८१ च्या दमदार स्ट्राईक रेटने फलंदाजी करत तब्बल ९ षटकार आणि ५ चौकार ठोकले. त्याला क्रृणाल पंड्याच्या ४३ धावांची उत्तम साथ लाभली, ज्यामुळे आरसीबीने २५४ धावांचा डोंगर उभा केला.
गुजरातची फलंदाजी फ्लॉप; राहुल तेवतियाची झुंज अपयशी
That’s how you 𝗣𝗟𝗔𝗬 𝗕𝗢𝗟𝗗! ❤️
Defending champions @RCBTweets are on their way to a second consecutive #TATAIPL final 👏😌
Scorecard ▶️ https://t.co/9rs6u5obOw#Qualifier1 | #TheFinalLeap | #RCBvGT pic.twitter.com/1bhTGqwTok
— IndianPremierLeague (@IPL) May 26, 2026
२५५ धावांच्या हिमालयासारख्या लक्षाचा पाठलाग करताना गुजरातची सुरुवात अत्यंत खराब झाली. फॉर्मात असलेला साई सुदर्शन १४ धावांवर विचित्र पद्धतीने हिट विकेट झाला, तर कर्णधार शुबमन गिल अवघ्या २ धावांवर बोल्ड झाला. जोस बटलरने ११ चेंडूंत २९ धावा करत प्रतिकार करण्याचा प्रयत्न केला. मात्र निशांत सिंधू (५), वॉशिंग्टन सुंदर (८) आणि जेसन होल्डर (०) झटपट बाद झाले. राहुल तेवतियाने अर्धशतक झळकावून गुजरातचा पराभव लांबवण्याचा प्रयत्न केला, पण तो पुरेसा ठरला नाही. आरसीबीकडून वेगवान गोलंदाज जेकब डफीने सर्वाधिक ३ बळी घेतले, तर रसिख सलाम आणि भुवनेश्वर कुमार यांनी प्रत्येकी २-२ विकेट्स घेतल्या.
गुजरातच्या पराभवाचे मुख्य कारण: क्षेत्ररक्षणातील घोडचुका!
गुजरातच्या पराभवाला त्यांची सुमार गोलंदाजी जितकी कारणीभूत होती, त्याहून अधिक त्यांची खराब फील्डिंग नडली. गुजरातने आरसीबीचा कर्णधार रजत पाटीदारला १४ व्या षटकात प्रसिद्ध कृष्णाच्या गोलंदाजीवर सलग दोन जीवदान दिले. पहिल्या चेंडूवर पाटीदार अवघ्या १८ धावांवर असताना त्याचा कॅच सुटला, आणि त्यानंतर तिसऱ्या चेंडूवर कागिसो रबाडाने त्याचा अगदी सोपा कॅच टपकावला. या दोन जीवदानाचा फायदा घेत पाटीदारने गुजरातचा गेम ओव्हर केला.
गुजरातला फायनलसाठी अजूनही एक संधी कायम!
या पराभवानंतरही शुभमन गिलच्या गुजरात टायटन्सचे फायनलचे स्वप्न संपलेले नाही. त्यांना ‘क्वालिफायर-२’ मध्ये खेळण्याची आणखी एक संधी मिळेल. २९ मई रोजी न्यू चंदीगड येथे गुजरातचा सामना २७ मे रोजी होणाऱ्या सनरायझर्स हैदराबाद (SRH) आणि राजस्थान रॉयल्स (RR) यांच्यातील ‘एलिमिनेटर’ सामन्याच्या विजेत्याशी होईल.





