RCB vs GT Final : अहमदाबादमध्ये रंगणार ‘किंग’ विरुद्ध ‘प्रिन्स’ महासंग्राम! आरसीबी जेतेपद राखणार की गुजरात हिशोब चुकता करणार?
RCB vs GT Final : गुजरात टायटन्स आणि रॉयल चॅलेंजर्स बगळुरु यांच्यातील हा थरार संध्याकाळी ७:३० वाजता सुरू होईल.

IPL 2026 RCB vs GT Final Head to Head Record : क्रिकेट विश्वातील सर्वात मोठी आणि रोमांचक लढत आता अवघ्या काही तासांवर येऊन ठेपली आहे. आयपीएल २०२६ चा महाअंतिम सामना रविवारी अहमदाबादच्या भव्य नरेंद्र मोदी स्टेडियमवर खेळवला जाणार आहे. गुजरात टायटन्स आणि रॉयल चॅलेंजर्स बगळुरु यांच्यातील हा थरार संध्याकाळी ७:३० वाजता सुरू होईल. गतविजेता आरसीबी संघ आपले जेतेपद राखण्याच्या इराद्याने मैदानात उतरेल, तर गुजरात टायटन्स आपल्या घरच्या मैदानावर चाहत्यांसमोर पुन्हा एकदा चषक उंचावण्यासाठी उत्सुक आहे.
दोन्ही संघांचा फायनलपर्यंतचा रंजक प्रवास!
आरसीबीने ‘क्वालिफायर-१’ मध्ये गुजरात टायटन्सचा ९२ धावांनी दारुण पराभव करून थेट फायनलमध्ये प्रवेश केला होता. या पराभवानंतर गुजरातने ‘क्वालिफायर-२’ मध्ये पुनरागमन केले. शुक्रवारी झालेल्या सामन्यात राजस्थान रॉयल्सने दिलेल्या २१५ धावांच्या आव्हानाचा यशस्वी पाठलाग करत गुजरातने ७ विकेट्सने विजय मिळवला आणि फायनलचे तिकीट पक्के केले. हा गुजरातचा आयपीएल इतिहासातील धावांचा सर्वात मोठा यशस्वी पाठलाग ठरला. आता दोन्ही संघांकडे आपले दुसरे आयपीएल जेतेपद जिंकण्याची सुवर्णसंधी आहे. गुजरातने २०२२ मध्ये पहिल्यांदा ट्रॉफी जिंकली होती, तर आरसीबीने २०२५ मध्ये आपला १८ वर्षांचा दुष्काळ संपवून विजेतेपद पटकावले होते.
IPL 2026 – Royal Challengers Bengaluru vs Gujarat Titans, Final Match
Time – 31 May 2026 | 07:30 PM IST
Venue – Narendra Modi Stadium, Ahmedabad, India#RCBGT #IPL2026 #TataIPL #IPLFinal #IPL
[IPL 2026 Final, RCB vs GT Ahmedabad]pic.twitter.com/WndnKoQntN
— Cricket Guru (@CricketGuru_CG) May 30, 2026
आकडेवारी काय सांगते? हेड-टू-हेड रेकॉर्ड्समध्ये चुरस!
दोन्ही संघांमधील आकडेवारी पाहिली तर हा सामना अत्यंत चुरशीचा होण्याची शक्यता आहे. आरसीबी आणि गुजरात यांच्यात आतापर्यंत एकूण ९ सामने खेळले गेले आहेत. यामध्ये आरसीबीने ५ सामने जिंकले आहेत, तर गुजरातने ४ सामन्यांत बाजी मारली आहे. चालू हंगामात दोन्ही संघ ३ वेळा आमने-सामने आले असून, यामध्ये आरसीबी २-१ ने आघाडीवर आहे. फायनलमध्ये आरसीबी ही आघाडी वाढवण्याचा प्रयत्न करेल, तर गुजरात हा हिशोब बरोबर करून चॅम्पियन बनण्याच्या प्रयत्नात असेल.
हेही वाचा – Satwik Chirag Final : सात्विक-चिरागचा ऐतिहासिक उलटफेर! वर्ल्ड नंबर-१ जोडीला धूळ चारत सिंगापूर ओपनच्या फायनलमध्ये दाखल
‘किंग’ विरुद्ध ‘प्रिन्स’ आणि धारदार गोलंदाजीचे युद्ध!
The dream of Title No. 2⃣ 🏆
But only 1⃣ can fulfill it on Sunday ❤️💙
Who will it be? 👀#TATAIPL | #Final | #TheFinalLeap | #RCBvGT | @RCBTweets | @gujarat_titans pic.twitter.com/IbjZHLSPBA
— IndianPremierLeague (@IPL) May 29, 2026
हा सामना केवळ दोन संघांमधील नसून आरसीबीचा ‘किंग’ विराट कोहली आणि गुजरातचा ‘प्रिन्स’ शुबमन गिल यांच्यातील वैयक्तिक महायुद्ध ठरणार आहे. हे दोन्ही दिग्गज फलंदाज आपापल्या संघाला चॅम्पियन बनवण्यासाठी सर्वस्व पणाला लावतील. फलंदाजीसोबतच दोन्ही संघांच्या धारदार गोलंदाजी आक्रमणातही तगडी फटकेबाजी आणि रणनीती पाहायला मिळणार आहे, ज्यामुळे या ऐतिहासिक फायनलची उत्सुकता शिगेला पोहोचली आहे.





