IPL 2024 (RCB vs DC Match 62) : दिल्लीचा आरसीबीविरूध्द गोलंदाजीचा निर्णय, संघात दोन महत्वपूर्ण बदल, जाणून घ्या Playing 11…

IPL 2024 (RCB vs DC Match 62, Playing XI) : आज आयपीएल 2024 च्या 62 व्या सामन्यात रॉयल चॅलेंजर्स बंगलोरचा सामना दिल्ली कॅपिटल्सशी होत आहे. हा सामना बेंगळुरूच्या चिन्नास्वामी स्टेडियमवर खेळला जात आहे. हा सामना रॉयल चॅलेंजर्ससाठी करो या मरो अशा स्थितीचा आहे. संघ हरला तर त्याचा प्रवास इथेच संपेल. मात्र, दिल्ली हरली तर त्याचा आणखी एक सामना बाकी आहे. मात्र, प्लेआॅफचा प्रवास त्याच्यासाठी खूप कठीण होणार आहे. या स्थितीत त्यांना इतर संघांच्या निकालावर अवलंबून राहावे लागेल.
तत्पूर्वी, दिल्ली कॅपिटल्सचा हंगामी कर्णधार अक्षर पटेलने नाणेफेक जिंकून प्रथम गोलंदाजी करण्याचा निर्णय घेतला आहे. अक्षरने सांगितले की, पंत मैदानावर उपस्थित आहे. तो म्हणाला की, पंतने सर्वांना सांगितले की, मी संघात नसलो तर आपण चांगले खेळू शकणार नाही, असा विचार करू नका. तो संघाला प्रेरित करत राहणा आहे. पंतनेही निलंबनाविरोधात अपील केले आहे. पंतच्या जागी कुमार कुशाग्र आयपीएलमध्ये पदार्पण करत आहे. त्याचवेळी रसिक दारनेही संघात प्रवेश केला आहे. बेंगळुरूचा कर्णधार फाफ डुप्लेसिसने प्लेइंग-11 मध्ये कोणताही बदल केलेला नाही.
🚨 Toss Update 🚨@DelhiCapitals win the toss and elect to bowl against @RCBTweets
Follow the Match ▶️ https://t.co/AFDOfgLefa#TATAIPL | #RCBvDC pic.twitter.com/Ljx8CVGrkv
— IndianPremierLeague (@IPL) May 12, 2024
RCB vs DC : Playing XI
रॉयल चॅलेंजर्स बंगलोर : फाफ डू प्लेसिस (कर्णधार), विराट कोहली, विल जॅक, रजत पाटीदार, कॅमेरॉन ग्रीन, महिपाल लोमरोर, दिनेश कार्तिक (विकेटकीपर), कर्ण शर्मा, मोहम्मद सिराज, लॉकी फर्ग्युसन, यश दयाल. ( इम्पॅक्ट सब : स्वप्नील सिंग, अनुज रावत, सुयश प्रभुदेसाई, विजयकुमार विशाक, हिमांशू शर्मा)
दिल्ली कॅपिटल्स : जेक फ्रेझर-मॅकगर्क, अभिषेक पोरेल (विकेटकीपर), शाई होप, कुमार कुशाग्रा, ट्रिस्टन स्टब्स, अक्षर पटेल (क), कुलदीप यादव, रसिक दार सलाम, मुकेश कुमार, इशांत शर्मा, खलील अहमद. ( इम्पॅक्ट सब: डेव्हिड वॉर्नर, सुमित कुमार, रिकी भुई, विकी ओस्तवाल, प्रवीण दुबे )
सध्या प्लेऑफच्या दृष्टिकोनातून प्रत्येक सामना एलिमिनेटरसारखा आहे. आरसीबीने आयपीएल 2024 मध्ये आतापर्यंत 12 सामने खेळले आहेत आणि संघ 10 गुणांसह गुणतालिकेत 7 व्या क्रमांकावर आहे. दुसरीकडे दिल्ली सध्या 12 गुणांसह पाचव्या स्थानावर आहे. यापैकी कोणताही संघ जिंकला तरी त्याची प्लेऑफमध्ये जाण्याची शक्यता कायम राहणार आहे, त्यामुळे आरसीबी विरुद्ध डीसी सामन्याला एलिमिनेटर सामना म्हणणे चुकीचे ठरणार नाही.
पंतशिवाय दिल्लीचा संघ उतरणार मैदानात…
राजस्थान रॉयल्सविरुद्धच्या सामन्यात दिल्ली कॅपिटल्स स्लो ओव्हर रेटसाठी दोषी आढळली होती. त्यामुळे दिल्लीचा कर्णधार ऋषभ पंतवर 30 लाखांचा दंड आणि एका सामन्याची बंदी घालण्यात आली आहे. आयपीएल 2024 मध्ये ही तिसरी वेळ आहे, जेव्हा डीसी निर्धारित वेळेच्या मर्यादेत 20 षटके टाकू शकला नाही. नियमांनुसार कर्णधार दोनदा स्लो ओव्हर रेटसाठी दोषी आढळल्यास त्याला फक्त दंडाला सामोरे जावे लागते, तिसऱ्यांदा कर्णधारावर एका सामन्याची बंदी घालण्यात येते. त्यामुळे ऋषभ पंत रॉयल चॅलेंजर्स बंगळुरूविरुद्धच्या सामन्यात खेळू शकणार नाही.
दोन्ही संघाना प्लेऑफमधील आव्हान कायम राखण्यासाठी विजय आवश्यक आहे. त्यामुळे दोन्ही संघांसाठी हा सामना करो या मरो असा आहे. जिंकणारी टीम स्पर्धेत कायम राहील. तर पराभूत होणाऱ्या संघाचं आव्हान संपुष्टात येईल. त्यामुळे दोन्ही संघात जोरदार चुरस पाहायला मिळणार आहे.
IRE vs PAK 1st T20 : बाबरच्या नेतृत्वाखाली पाकिस्तानची अवस्था बिकट; आयर्लंडकडून प्रथमच पाकचा पराभव…
जर रॉयल चॅलेंजर्स बंगळुरूला आयपीएल 2024 च्या प्लेऑफमध्ये पोहोचायचे असेल तर त्यांना उर्वरित दोन्ही सामने जिंकावे लागतील. लीग टप्प्यातील हा बेंगळुरूचा 13वा सामना असेल, जो जिंकल्यास संघाला 12 गुण मिळतील. RCB चा निव्वळ रन-रेट +0.217 असल्याने, त्याची प्लेऑफमध्ये जाण्याची शक्यता जास्त आहे. पण त्यांच्या आशा जिवंत ठेवण्यासाठी बेंगळुरूला कोणत्याही किंमतीत दिल्ली कॅपिटल्सवर विजय नोंदवावा लागेल. आजचा सामना DC ने जिंकला तर RCB बाहेर होईल.





