RCB W vs DC W : शतक हुकलं पण दिल्लीला नमवलं! स्मृती मानधनाची कॅप्टन इनिंग; आरसीबीने ठोकला विजयाचा चौकार

RCB W vs DC W RCB beat DC by 8 Wickets : महिला प्रीमियर लीग (WPL) २०२६ च्या ११ व्या सामन्यात रॉयल चॅलेंजर्स बगळुरू (RCB) संघाने आपला दबदबा कायम राखला आहे. आरसीबीने दिल्ली कॅपिटल्सचा ८ विकेट्सनी पराभव करत विजयाचा चौकार ठोकला. डी. वाय. पाटील स्टेडियमवर रंगलेल्या या सामन्यात आरसीबीच्या गोलंदाजांनी दिल्लीला १६६ धावांत गुंडाळले आणि त्यानंतर कर्णधार स्मृती मानधनाच्या स्फोटक खेळीच्या जोरावर १० चेंडू राखून विजय साकारला.
स्मृती मानधनाचं हुकलं शतक, पण जिंकलं मन –
दिल्लीने दिलेल्या १६७ धावांच्या आव्हानाचा पाठलाग करताना स्मृती मानधना आज वेगळ्याच लयीत दिसली. तिने ६१ चेंडूत १३ चौकार आणि ३ षटकारांच्या मदतीने ९६ धावांची तुफानी खेळी केली. डब्ल्यूपीएलच्या इतिहासातील पहिले शतक झळकावण्यापासून ती अवघ्या ४ धावा दूर असताना १८ व्या षटकात नंदिनी शर्माच्या चेंडूवर बाद झाली. स्मृतीने जॉर्जिया वॉल (नाबाद ५४) सोबत दुसऱ्या विकेटसाठी १४२ धावांची मोठी भागीदारी केली. जॉर्जियाने ५ चौकार आणि २ षटकारांसह आपले अर्धशतक पूर्ण केले.
Making winning a habit 🥳@RCBTweets marching bold as they make it 4⃣ in 4⃣ ❤️
A convincing 8⃣-wicket victory to wrap up the Navi Mumbai leg 🙌
Scorecard ▶️ https://t.co/NnuH8NbLG5 #TATAWPL | #KhelEmotionKa | #DCvRCB pic.twitter.com/cDbPBCVqo6
— Women’s Premier League (WPL) (@wplt20) January 17, 2026
दिल्लीची सुरुवातीला दाणादाण, शफालीचा संघर्ष –
9⃣6⃣ runs
6⃣1⃣ balls
1⃣3⃣ fours
3⃣ sixesFor her outstanding captain’s knock, Smriti Mandhana is named the Player of the Match 🏅
Relive her knock ▶️ https://t.co/QxnVr2MXnT#TATAWPL | #KhelEmotionKa | #DCvRCB | @mandhana_smriti pic.twitter.com/0Z7n9rWd5P
— Women’s Premier League (WPL) (@wplt20) January 17, 2026
तत्पूर्वी, नाणेफेक हारल्यानंतर फलंदाजीला उतरलेल्या दिल्ली कॅपिटल्सची सुरुवात अत्यंत खराब झाली. अवघ्या १० धावांत दिल्लीने ४ महत्त्वाचे बळी गमावले होते. मात्र, शेफाली वर्माने ४१ चेंडूत ६२ धावा (५ चौकार, ४ षटकार) कुटून डावाला आकार दिला. पदार्पण करणाऱ्या लुसी हॅमिल्टनने १९ चेंडूत ३६ धावांची झंझावाती खेळी केली. स्नेह राणाने २२ धावांचे योगदान दिले. मात्र, जेमिमा रॉड्रिग्स (४), लिझेली ली (४) यांसारख्या मोठ्या खेळाडूंच्या अपयशामुळे दिल्लीचा डाव १६६ धावांवर आटोपला.
आरसीबीच्या गोलंदाजांची शानदार कामगिरी –
आरसीबीकडून लॉरेन बेल आणि सायली सातघरे यांनी प्रत्येकी ३ विकेट्स घेत दिल्लीच्या फलंदाजीचे कंबरडे मोडले. प्रेमा रावतने २ विकेट्स घेतल्या. या विजयासह आरसीबीने गुणतालिकेत आपली पकड अधिक घट्ट केली आहे.





