RCB vs CSK : आरसीबीने रोमांचक सामन्यात सीएसकेला पाजलं पाणी! आयुष म्हात्रेची वादळी खेळी ठरली व्यर्थ

RCB vs CSK Royal Royal Challengers Bangalore beat Chennai Super Kings by 2 runs : विराट कोहली, जेकब बेथेल आणि रोमारियो शेफर्ड यांच्या अर्धशतकांनंतर धारदार गोलंदाजीमुळे आरसीबीने सीएसकेचा २ धावांनी पराभव केला. शेवटच्या षटकाच्या रोमांचक खेळात, सीएसकेला जिंकण्यासाठी १६ धावांची आवश्यकता होती, परंतु यश दयालने फक्त १३ धावा दिल्या आणि सामना आरसीबीच्या हाती सोपवला. अशाप्रकारे, आरसीबीने या हंगामात आठव्या विजयासह १६ गुणांची कमाई केली. मात्र, १६ गुण होऊनही आरसीबी संघ अधिकृतपणे प्लेऑफमध्ये पोहोचलेला नाही.
एम चिन्नास्वामी क्रिकेट स्टेडियमवर नाणेफेक जिंकल्यानंतर सीएसकेचा कर्णधार महेंद्रसिंग धोनीने आरसीबीला प्रथम फलंदाजी करण्यास सांगितले. प्रथम फलंदाजी करताना, आरसीबीने विराट कोहली, जेकब बेथेल आणि रोमारियो शेफर्ड यांच्या अर्धशतकांच्या मदतीने निर्धारित २० षटकांत ५ गडी गमावून २१३ धावा केल्या. प्रत्युत्तरादाखल, सीएसकेने जोरदार खेळ केला आणि एकेकाळी सामना त्यांच्या बाजूने होता, परंतु दुर्दैवाने ते लक्ष्य गाठण्यात कमी पडले. लक्ष्याचा पाठलाग करताना सीएसकेला २० षटकांत फक्त २११ धावा करता आल्या. सीएसकेसाठी म्हात्रे आणि जडेजाने अर्धशतक झळकावले.
A clash for the ages 👏
A finish that’ll be remembered for years🔥#RCB triumph in an absolute thriller as Yash Dayal holds off the mighty #CSK in a roaring Bengaluru night 💪Scorecard ▶ https://t.co/I4Eij3Zfwf#TATAIPL | #RCBvCSK | @RCBTweets pic.twitter.com/IDKvGd3wuP
— IndianPremierLeague (@IPL) May 3, 2025
आरसीबीच्या फलंदाजांनी सीएसकेच्या गोलंदाजांची केली धुलाई –
𝗦𝗵𝗲𝗽𝗵𝗲𝗿𝗱𝗶𝗻𝗴 a power-packed finish and special victory 👏❤️
For his magnificent innings, Romario Shepherd is adjudged the Player of the Match 🔝
Scorecard ▶ https://t.co/I4Eij3ZNlN#TATAIPL | #RCBvCSK | @RCBTweets pic.twitter.com/uSOVopOG4N
— IndianPremierLeague (@IPL) May 3, 2025
आरसीबीच्या टॉप ऑर्डरच्या फलंदाजांनी शानदार खेळी केली. विराट कोहली आणि जेकब बेथेल यांनी डावाची सुरुवात केली आणि पहिल्या विकेटसाठी ९७ धावांची भागीदारी केली. यानंतर, रोमारियो शेफर्डने फक्त १४ चेंडूत अर्धशतक ठोकून आरसीबीच्या गोलंदाजांसाठी अडचणी निर्माण केल्या. आरसीबीसाठी झालेल्या सामन्यात विराट कोहलीने ३३ चेंडूत ६२ धावा केल्या तर बेथेलने ३३ चेंडूत ५५ धावांचे योगदान दिले. चेन्नईच्या गोलंदाजांच्या दिशाहीन कामगिरीमुळे त्यांचे काम सोपे झाले. अखेर शेफर्डने १४ चेंडूंत चार चौकार आणि सहा षटकारांसह नाबाद ५४ धावा केल्या. त्याने आयपीएलमधील संयुक्त दुसरे सर्वात जलद अर्धशतक केले.
हेही वाचा – RCB vs CSK : ६, ६, ४, ७….रोमारियो शेफर्डने केला कहर! खलीलच्या एकाच षटकात कुठल्या तब्बल ‘इतक्या’ धावा
आयुष म्हात्रेने साकारली वादळी खेळी –
चेन्नई सुपर किंग्जची सुरुवात खराब झाली. कारण शेख रशीद फक्त १४ धावा करून पॅव्हेलियनमध्ये परतला. यानंतर, सॅम करन देखील मोठी खेळी खेळू शकला नाही आणि ५ धावा करून बाद झाला. पण दोन विकेट पडल्यानंतर, युवा आयुष महात्रे आणि रवींद्र जडेजा यांनी शानदार फलंदाजी केली. प्रथम, दोघांनीही शानदार पद्धतीने आपले अर्धशतक पूर्ण केले. या सामन्यात महात्रेने ४८ चेंडूत ९४ धावा केल्या. त्याने त्याच्या डावात 9 चौकार आणि पाच षटकार मारले.
हेही वाचा – RCB vs CSK : विराट कोहली ठरला नवा सिक्सर किंग! रोहित-गेलला जे जमलं नाही ते करुन दाखवलं
लुंगी एनगिडीने सलग दोन चेंडूत दोन विकेट घेत सामना फिरवण्याचा प्रयत्न केला. त्याने म्हात्रे आणि डेवाल्ड ब्रेव्हिस यांना सलग चेंडूंवर बाद केले. जडेजाने ७७ धावा केल्या, पण तो संघाला विजय मिळवून देऊ शकला नाही. यश दयालने आरसीबीसाठी २० वे षटक टाकले आणि या षटकात त्याने शानदार गोलंदाजी केली. त्याच्याशिवाय, एन्गिडीने सामन्यात तीन विकेट्स घेतल्या.





