RCB vs CSK : ‘जेलची जर्सी’ दाखवून CSK चे स्वागत; सामन्यापूर्वी RCB च्या चाहत्यांनी केले ट्रोल, पाहा VIDEO

RCB Fans Troll CSK team with Jail Jersey video viral : आयपीएल २०२५ मधील ५२ सामना सामना यजमान आरसीबी आणि सीएसके यांच्यात खेळला जाणार आहे. चिन्नास्वामीवर होणाऱ्या या हाय व्होल्टेज सामन्यापूर्वी एक विचित्र दृश्य पाहायला मिळाले. ज्यामुळे सामन्यापूर्वीच आरसीबीच्या चाहत्यांनी तापमान वाढवले. खरंतर, जेव्हा सीएसकेचे खेळाडू एम चिन्नास्वामी स्टेडियमकडे जात होते, तेव्हा स्टेडियमबाहेर असलेल्या आरसीबी चाहत्यांनी ‘जेल जर्सी’ दाखवून त्यांचे स्वागत केले. सामन्यापूर्वी त्याने धोनीच्या संपूर्ण संघाला ट्रोल करण्याचा प्रयत्न केला. ज्याचा व्हिडीओ व्हायरल झाला आहे.
आरसीबीच्या चाहत्यांनी सीएसकेच्या टीमला केले ट्रोल –
RCB Fans are ready to welcome CSK at Chinnaswamy pic.twitter.com/DtPAHeClSG
— RCBIANS OFFICIAL (@RcbianOfficial) May 3, 2025
Crazy humiliation of CSK dogs 😭 pic.twitter.com/osZUFDNMwk
— ` (@naeem_backup) May 3, 2025
आरसीबी आणि सीएसके हे आयपीएलचे सर्वात मोठे प्रतिस्पर्धी मानले जातात. कारण दोन्ही संघांत नेहमीच रोमांचक सामना पाहायला मिळतो. चाहते त्यांच्या संघांबद्दल इतके उत्साही आहेत की यापूर्वीही अनेकदा वादही झाले आहेत. या हंगामात संघर्ष करत असलेला सीएसके संघ जेव्हा आरसीबीचा सामना करण्यासाठी एम चिन्नास्वामीकडे पोहोचला, तेव्हा यजमान संघाच्या चाहत्यांनी त्यांचे एका अनोख्या पद्धतीने स्वागत केले. त्यांनी एक पांढरी जर्सी दाखवण्यात आली ज्यावर बार होते आणि त्यावर २०१६-२०१७ लिहिलेले होते. ती तुरुंगात कैद्यांना दिल्या जाणाऱ्या शर्टसारखी दिसत होती.
Officially selling CSK Jail jerseys 🤣🤣 outside of chinnaswamy pic.twitter.com/KKPAxrSHxM
— Praneeth VK¹⁸ (@fantasy_d11) May 3, 2025
स्टेडियमबाहेर ही जर्सी विकणाऱ्या व्यक्तीने त्याच्या स्टॉलवर एक छोटा बोर्ड लावला होता, ज्यावर “आरसीबी विरुद्ध सीएसके सामन्याची खास जर्सी” असे लिहिले होते. चेन्नई सुपर किंग्जवर फिक्सिंग आणि बेटिंगसारख्या आरोपांवरून दोन वर्षांची बंदी घालण्यात आली होती. २०१६ आणि २०१७ मध्ये हा संघ या स्पर्धेत सहभागी होऊ शकला नव्हता. आरसीबीचे चाहते याकडे बोट दाखवून सीएसकेच्या खेळाडूंना ट्रोल करण्याचा प्रयत्न करत होते.
हेही वाचा – Greg Chappell : ‘वैभवला योग्यरित्या हाताळला नाही, तर…’, चॅपेलने बीसीसीआयला दिला महत्त्वाचा इशारा
आरसीबी विरुद्ध सीएसके हेड टू हेड रेकॉर्ड –
आयपीएलमध्ये आतापर्यंत आरसीबी आणि सीएसके यांच्यात ३४ सामने खेळले गेले आहेत. ज्यापैकी सीएसकेने २१ आणि आरसीबीने १२ सामने जिंकले आहेत. दोन्ही संघांमधील एक सामनाही अनिर्णीत राहिला आहे. याचा अर्थ असा की एकूणच चेन्नईने आतापर्यंत वरचढ कामगिरी केली आहे. आरसीबीच्या होम ग्राउंड चिन्नास्वामी स्टेडियमबद्दल बोलायचे झाले तर, येथे दोन्ही संघांमध्ये ११ सामने खेळले गेले आहेत, दोघांनीही ५-५ सामने जिंकले आहेत आणि एका सामन्यात निकाल लागला नाही.





