RCB vs CSK : आरसीबीने चेन्नईचा धुव्वा उडवत नोंदवला सलग दुसरा दमदार विजय! सीएसकेने साधली पराभवाची हॅट्ट्रिक
RCB vs CSK : गतविजेत्या आरसीबीने चेन्नई सुपर किंग्सचा ४३ धावांनी पराभव करत सलग दुसरा विजय नोंदवला.

RCB vs CSK Royal Challengers Bengaluru win by 43 runs : आयपीएल २०२६ च्या ११ व्या सामन्यात आरसीबी संघाने आपला विजयाचा धडाका कायम राखला आहे. एम. चिन्नास्वामी स्टेडियमवर झालेल्या हाय-व्होल्टेज लढतीत, गतविजेत्या आरसीबीने सीएसकेचा ४३ धावांनी पराभव करत सलग दुसरा विजय नोंदवला. तसेच घरच्या मैदानावर खेळताना आरसीबीने पुन्हा एकदा सिद्ध केले की त्यांना ‘चॅम्पियन’ का म्हटले जाते.
सुरुवातीची तीन षटके शांत राहिल्यानंतर विराटने गिअर बदलला आणि त्यानंतर फिल सॉल्टने डावाला गती दिली. फलंदाजीला पोषक असलेल्या खेळपट्टीवर आरसीबीच्या फलंदाजांनी षटकारांचा पाऊस पाडला. विराटने रोहित शर्माचा विक्रम मोडीत काढत एक खास कामगिरी केली, तर देवदत्त पडिक्कलने सलग दुसरे अर्धशतक ठोकून संघाचा स्कोअर १५० च्या पार नेला.
Make that 2️⃣ in a row for the defending champions! ✨#RCB puts on an absolute clinic to defeat #CSK by 43 runs in the Sunday blockbuster ❤️
SCORECARD ▶️ https://t.co/PkhPvxcU44#TATAIPL | #KhelBindaas | #RCBvCSK | @RCBTweets pic.twitter.com/dqXArcNPZ6
— IndianPremierLeague (@IPL) April 5, 2026
डेव्हिड-पाटीदारची ‘फिनिशिंग’ फटकेबाजी –
खरा थरार शेवटच्या ५ षटकांत पाहायला मिळाला. टिम डेव्हिड आणि कर्णधार रजत पाटीदार यांनी मिळून शेवटच्या ३० चेंडूत तब्बल ९७ धावा कुटल्या. यामध्ये टिम डेव्हिडचा रुद्रावतार पाहायला मिळाला; त्याने अवघ्या २५ चेंडूत ८ षटकार आणि ३ चौकारांच्या मदतीने नाबाद ७० धावा केल्या. एकट्या १९ व्या षटकात त्याने ३० धावा वसूल केल्या. पाटीदारनेही १९ चेंडूत ४८ धावांची नाबाद खेळी करत संघाला २५० धावांच्या या मोसमातील सर्वोच्च धावसंख्येपर्यंत पोहोचवले.
चेन्नईचा प्रतिकार ठरला अपयशी –
प्रत्युत्तरात २५१ धावांच्या विशाल लक्ष्याचा पाठलाग करताना सीएसकेडून सर्फराझ खान (५०) आणि प्रशांत वीर (४३) यांनी थोडाफार प्रतिकार करण्याचा प्रयत्न केला. मात्र, इतर सर्व फलंदाजांनी निराशा केली. ज्यामुळे चेन्नईला २० षटकांत २०७ धावांपर्यंतच मजल मारता आली. आरसीबीकडून जेकब डफी आणि भुवनेश्वर कुमार यांनी शिस्तबद्ध गोलंदाजी केली. भुवीने आयुष म्हात्रेला बाद करून आयपीएलमधील आपल्या २०० विकेट्स पूर्ण केल्या आणि इतिहासात नाव कोरले. गेल्या वर्षी घरच्या मैदानावर खराब सुरुवात करणाऱ्या आरसीबीने यंदा मात्र दोन्ही सुरुवातीचे सामने जिंकून गुणतालिकेत आपले स्थान मजबूत केले आहे.





