Dinesh Karthik Argument : पाणी पिण्यावरून वाद? दिनेश कार्तिक अन् पंचांमध्ये कडाक्याचे भांडण; पाहा नेमकं काय घडलं?
Dinesh Karthik Argument : दिनेश कार्तिक आणि मुख्य प्रशिक्षक अँडी फ्लॉवर यांचा पंचांशी झालेला वाद सध्या सोशल मीडियावर तुफान व्हायरल होत आहे.

Dinesh Karthik Argument with Umpire IPL 2026 : आयपीएल २०२६ च्या हंगामात ५ एप्रिल रोजी झालेल्या आरसीबी आणि सीएसके यांच्यातील सामन्यात मैदानावर हाय-व्होल्टेज ड्रामा पाहायला मिळाला. आरसीबीचा फलंदाजी प्रशिक्षक दिनेश कार्तिक आणि मुख्य प्रशिक्षक अँडी फ्लॉवर यांचा पंचांशी झालेला वाद सध्या सोशल मीडियावर तुफान व्हायरल होत आहे. नेमकं वादाचं कारण काय होतं?
आरसीबी आणि सीएसके यांच्यातील थरारक सामन्यात केवळ खेळाडूच नाही, तर कोचिंग स्टाफही आक्रमक भूमिकेत दिसला. १४ व्या षटकानंतर जेव्हा ड्रिंक्स ब्रेक झाला, तेव्हा दिनेश कार्तिक आणि अँडी फ्लॉवर थेट पंचांशी भिडले. स्टार स्पोर्ट्स कन्नडाच्या फुटेजमध्ये कार्तिक कमालीचा उखडलेला दिसला, तर एंडी फ्लॉवरही पंचांच्या निर्णयावर आश्चर्य व्यक्त करताना दिसले.
पाणी पिण्यावरून वाद? की सत्य काही वेगळं?
सोशल मीडियावर सुरुवातीला असा दावा करण्यात आला की, आरसीबीच्या खेळाडूंनी आणलेले पाणी पंचांनी प्यायल्यामुळे कार्तिक संतापला. मात्र, वादाचे खरे कारण ‘पाणी’ नसून ‘स्ट्रॅटेजिक टाईमआऊट’ (Strategic Timeout) हे होते. नियमानुसार फलंदाजी करणाऱ्या संघाला १३ ते १६ षटकांच्या दरम्यान अडीच मिनिटांचा ब्रेक मिळतो. मात्र, आरसीबीच्या गोटातून कोणीही हा ब्रेक मागितला नव्हता.
कोणाच्या इशाऱ्यावरून खेळ थांबवला?
दिनेश कार्तिक रजत पाटीदार और देवदत्त पडिक्कल के लिए ड्रिंक्स लेकर आए… अंपायर ने एक ड्रिंक छीन ली 😭
पाटीदार गुस्से से बोले: “वापस करो!” 😂
अंपायर ने उन्हें वापस आते देखा और झट से ड्रिंक लौटा दी 🤣
कार्तिक, एंडी फ्लावर और पाटीदार की प्रतिक्रियाएँ बहुत मज़ेदार थीं 😂 pic.twitter.com/DnE177g1Aw
— ममता ट्राबल (@Mamtasulaniya) April 6, 2026
क्रीजवर असलेले फलंदाज रजत पाटीदार आणि देवदत्त पडिक्कल किंवा डगआऊटमधील कोणीही टाईमआऊटची मागणी केली नव्हती. तरीही पंचांनी खेळ थांबवल्यामुळे दिनेश कार्तिक संतापला. पंचांनी डगआऊटकडे बोट दाखवून कोणीतरी इशारा केल्याचे सांगितले, मात्र कार्तिक आणि फ्लॉवरने ते पूर्णपणे नाकारले. आरसीबीची फलंदाजी रंगात आलेली असताना विनाकारण लय तोडल्यामुळे प्रशिक्षकांनी पंचांकडे आपली नाराजी स्पष्टपणे बोलून दाखवली. या घटनेचा व्हिडिओ सध्या क्रिकेट वर्तुळात चर्चेचा विषय ठरला आहे.





