Sarfaraz Khan Record : सर्फराझ खानचा वर्ल्ड रेकॉर्ड! पॉवरप्लेमध्ये ‘हा’ पराक्रम करणारा ठरला जगातील पहिलाच खेळाडू
Sarfaraz Khan Record : सर्फराझने आपल्या कारकिर्दीची सुरुवात केली होती, त्याच मैदानात त्याने ११ वर्षांनंतर एक अद्भूत विक्रम आपल्या नावे केला.

Sarfaraz Khan Powerplay Fifty Record IPL 2026 : आरसीबीने (RCB)दिलेल्या २५१ धावांच्या विशाल लक्ष्याचा पाठलाग करताना चेन्नई सुपर किंग्सची (CSK) अवस्था अत्यंत बिकट झाली होती. केवळ १७ धावांत चेन्नईचे आघाडीचे तीन फलंदाज तंबूत परतले होते. अशा कठीण प्रसंगी सर्फराझ खानने मैदानात उतरून वादळी फलंदाजी केली. त्याने २०० च्या स्ट्राईक रेटने खेळत पॉवरप्लेच्या पहिल्या ६ षटकांतच आपले अर्धशतक पूर्ण केले.
जगातील पहिलाच फलंदाज (Sarfaraz Khan Record)-
सर्फराझ खान आता आयपीएल ( IPL) इतिहासातील चौथ्या किंवा त्यापेक्षा खालच्या क्रमांकावर फलंदाजीला येऊन पॉवरप्लेमध्ये (पहिल्या ६ ओव्हर्समध्ये) अर्धशतक ठोकणारा जगातील पहिलाच फलंदाज ठरला आहे. यापूर्वी असा पराक्रम कोणालाही जमला नव्हता. २०१५ मध्ये आरसीबीसाठी खेळताना त्याने याच मैदानात ४५ धावांची नाबाद खेळी केली होती, आता ११ वर्षांनंतर त्याने त्याच संघाविरुद्ध आपल्या बॅटची धार दाखवली.
२,५५६ दिवसांनंतर गाठला अर्धशतकी टप्पा – Sarfaraz Khan Record
A brilliant counter-attack comes to an end! 👏
Krunal Pandya strikes first ball as Sarfaraz Khan departs for 50 (25)!
Updates ▶️ https://t.co/PkhPvxcU44#TATAIPL | #KhelBindaas | #RCBvCSK pic.twitter.com/t9MG5awekU
— IndianPremierLeague (@IPL) April 5, 2026
सर्फराझसाठी हे अर्धशतक भावनिकदृष्ट्याही मोठे होते. त्याने यापूर्वी ६ एप्रिल २०१९ रोजी पंजाब किंग्ससाठी अर्धशतक झळकावले होते. त्यानंतर तब्बल २,५५६ दिवसांच्या मोठ्या अंतराने त्याने हे दुसरे अर्धशतक ठोकले आहे. दोन आयपीएल अर्धशतकांमधील सर्वात जास्त दिवसांच्या अंतराच्या बाबतीत सर्फराझ आता क्रृणाल पंड्यानंतर (३,२६९ दिवस) दुसऱ्या क्रमांकावर पोहोचला आहे.
चेन्नईचा संघर्ष अपयशी –
या सामन्यात सर्फराझने ५०, प्रशांत वीरने ४३ आणि जेमी ओव्हरटनने ३७ धावांची खेळी केली. मात्र, आरसीबीच्या २५० धावांच्या डोंगरापुढे चेन्नईचा प्रतिकार अपुरा पडला. आरसीबीकडून भुवनेश्वर कुमारने ३ विकेट्स घेतल्या, तर जेकब डफी आणि क्रृणाल पंड्या यांनी प्रत्येकी २ विकेट्स घेत बंगळुरूला ४३ धावांनी विजय मिळवून दिला. Sarfaraz Khan Record





