RCB vs CSK : आरसीबीला ‘ती’ कृती करणं पडलं महागात! सीएसकेने बीसीसीआयकडे केली तक्रार, नेमकं प्रकरण काय?
RCB vs CSK : सामन्यादरम्यान वाजवण्यात आलेल्या एका गाण्यामुळे आणि डीजेने (DJ) केलेल्या टिप्पण्यांमुळे चेन्नई संघाने संताप व्यक्त केला आहे.

RCB vs CSK DJ Controversy : आयपीएल २०२६ च्या मैदानावर केवळ खेळाडूंच्या कामगिरीचीच नाही, तर आता ऑफ-फील्ड वादाचीही मोठी चर्चा रंगली आहे. चेन्नई सुपर किंग्स (CSK) आणि रॉयल चॅलेंजर्स बेंगळुरू (RCB) यांच्यातील ‘सदर्न डर्बी’ आता थेट बीसीसीआयच्या दरबारी पोहोचली असून, चिन्नास्वामी स्टेडियमवरील एका गाण्यामुळे नवा वाद उफाळून आला आहे. ( RCB vs CSK)
नेमकं कारण काय? RCB vs CSK
५ एप्रिल रोजी बंगळुरूच्या एम. चिन्नास्वामी स्टेडियमवर आरसीबी विरुद्ध चेन्नई सुपर किंग्स हा सामना पार पडला. या सामन्यात आरसीबीने विजय मिळवला असला तरी, सामन्यादरम्यान वाजवण्यात आलेल्या एका गाण्यामुळे आणि डीजेने (DJ) केलेल्या टिप्पण्यांमुळे चेन्नई संघाने संताप व्यक्त केला आहे. सीएसकेने याप्रकरणी भारतीय क्रिकेट नियामक मंडळाकडे (BCCI) अधिकृत तक्रार दाखल केली आहे.
काय आहे ‘इडली-सांभर’ वादाचे मूळ?
🚨 CHENNAI SUPER KINGS RAISE COMPLAINT 🚨
– Complaint filed to the Board of Control for Cricket in India regarding DJ songs & remarks at Chinnaswamy 🎧
– An unusual off-field controversy during the IPL clash 👀🔥(TOI)#RCBvsCSK #DJ pic.twitter.com/iIeDy30cmu— Faruk🐦 (@uf2151593) April 16, 2026
चेन्नईच्या फलंदाजीला सुरुवात होण्यापूर्वी स्टेडियममध्ये “डोसा, इडली, सांभर, चटनी” हे गाणे वाजवण्यात आले. या गाण्याचा संबंध एका जुन्या वादाशी आहे. आरसीबीने यापूर्वी एक व्हिडिओ शेअर केला होता, ज्यामध्ये त्यांचा यष्टीरक्षक जितेश शर्मा हे गाणे गाताना दिसला होता. त्यानंतर चेपॉक स्टेडियमवर (चेन्नई) झालेल्या सामन्यात जितेश बाद झाल्यावर तिथल्या डीजेने हेच गाणे वाजवून त्याला ट्रोल केले होते. मात्र, त्यानंतर सीएसके व्यवस्थापनाने आपल्या डीजेला अशा प्रकारे विरोधी खेळाडूंची थट्टा न करण्याचे स्पष्ट निर्देश दिले होते. (RCB vs CSK)
खेळाडूंवर वैयक्तिक टिप्पणी केल्याचा आरोप – (RCB vs CSK )
Chennai Super Kings have lodged a complaint with BCCI over alleged insensitive songs and remarks by the DJ during their clash against RCB in Bengaluru. The “Dosa, Idli, Sambar” track and comments targeting players have sparked fresh controversy in IPL 2026.#CSK #RCB #IPL2026… pic.twitter.com/fTFBBJiHUE
— The Daily Jagran (@TheDailyJagran) April 16, 2026
सीएसकेचे व्यवस्थापकीय संचालक काशी विश्वनाथन यांनी सांगितले की, डीजेचे काम घरच्या संघाचा उत्साह वाढवणे असते, पण चिन्नास्वामीवर विरोधी संघाच्या खेळाडूंचा अपमान करण्यात आला. सीएसकेचे खेळाडू बाद झाल्यावर डीजेने पब्लिक ॲड्रेस सिस्टमवरून केलेल्या टिप्पण्या अत्यंत आक्षेपार्ह होत्या. “विरोधी संघाचा अपमान करणे हे डीजेचे काम नाही,” असे म्हणत सीएसकेने बीसीसीआयला पत्र लिहून चौकशीची मागणी केली आहे. आयपीएल गव्हर्निंग कौन्सिल आता या प्रकरणाची सखोल चौकशी करणार असल्याचे एका वरिष्ठ अधिकाऱ्याने स्पष्ट केले आहे.





