Ravi Shastri Stand : वानखेडेवर रंगला रवी शास्त्रींचा गौरव सोहळा! ऐतिहासिक मैदानावर शास्त्रींचं नाव अजरामर, पाहा VIDEO
Ravi Shastri Stand : मुंबई क्रिकेट असोसिएशनने (MCA) आयोजित केलेल्या या दिमाखदार सोहळ्यात रवि शास्त्री यांच्या क्रिकेटमधील योगदानाचा गौरव करण्यात आला.

Ravi Shastri Stand Wankhede Stadium : मुंबईचे ऐतिहासिक वानखेडे स्टेडियम गुरुवारी (९ एप्रिल) एका अविस्मरणीय सोहळ्याचे साक्षीदार ठरले. भारतीय क्रिकेट संघाचे माजी प्रशिक्षक आणि दिग्गज अष्टपैलू खेळाडू रवी शास्त्री यांच्या नावाने वानखेडेवर एका खास ‘स्टँड’चे अनावरण करण्यात आले. मुंबई क्रिकेट असोसिएशनने (MCA) आयोजित केलेल्या या दिमाखदार सोहळ्यात इतर दिग्गजांच्याही क्रिकेटमधील योगदानाचा गौरव करण्यात आला.
यावेळी महान फलंदाज सुनील गावस्कर आणि भारताचा टी-२० कर्णधार सूर्यकुमार यादव यांच्यासह अनेक दिग्गज क्रिकेटपटू उपस्थित होते. या सोहळ्याचे वैशिष्ट्य म्हणजे केवळ शास्त्रीच नव्हे, तर डायना एडुल्जी, एकनाथ सोलकर आणि दिलीप सरदेसाई यांसारख्या दिग्गज क्रिकेटपटूंच्या नावाने स्टेडियमच्या प्रवेशद्वारांचे (Gates) नामकरण करण्यात आले. Ravi Shastri Stand
THE RAVI SHASTRI STAND AT THE WANKHEDE STADIUM. pic.twitter.com/YJ3F7RoP2G
— Mufaddal Vohra (@mufaddal_vohra) April 10, 2026
वडिलांच्या आठवणीने डोळे पाणावले – Ravi Shastri Stand
VIDEO | Mumbai Cricket Association unveils Ravi Shastri Stand at Wankhede Stadium in Mumbai. On the occasion, former Indian captain Ravi Shastri (@RaviShastriOfc) says, “My wife is here, daughter is here, she never saw me playing… My sister is there, my nephew is there,… pic.twitter.com/AWaM7zrojD
— Press Trust of India (@PTI_News) April 9, 2026
आपल्या भाषणादरम्यान रवी शास्त्री अत्यंत भावूक झाले होते. आपल्या कुटुंबाचा उल्लेख करताना ते म्हणाले, “माझी पत्नी, मुलगी, बहीण आणि कुटुंबातील सर्व सदस्य आज येथे आहेत. पण एका व्यक्तीची उणीव खूप भासत आहे— माझे वडील. ते माझे खरे हिरो होते. ते नेहमी वानखेडेच्या गरवारे पॅव्हेलियनमधून माझे सामने पाहायचे. आज हा सन्मान पाहून त्यांना नक्कीच अभिमान वाटला असता.”
त्या ऐतिहासिक षटकाराची आठवण –
The stand named after Ravi Shastri was unveiled at Wankhede Stadium.❤️ pic.twitter.com/NfreByCam0
— 𝐑𝐮𝐬𝐡𝐢𝐢𝐢⁴⁵ (@rushiii_12) April 9, 2026
शास्त्रींनी आपल्या कारकिर्दीतील एक खास आठवण शेअर केली. ऑस्ट्रेलियाविरुद्ध खेळताना ब्रूस रीडच्या चेंडूवर त्यांनी मारलेला तो प्रसिद्ध षटकार ज्या दिशेला गेला होता, आज नेमक्या त्याच स्टँडला ‘रवि शास्त्री स्टँड’ असे नाव देण्यात आले आहे. “तो माझा आवडता शॉट होता आणि तो याच स्टँडच्या वरून गेला होता,” असे शास्त्रींनी आनंदाने नमूद केले.
महिला क्रिकेटपटूचाही सन्मान –
Honoured and humbled – to have a stand at Wankhede, my karmabhoomi, is incredibly special. This is where the journey began, and where I learned what it takes to compete, fight and never give an inch. I missed my father dearly, but I’m grateful my mother and family could be there… pic.twitter.com/Qx58KCvDYT
— Ravi Shastri (@RaviShastriOfc) April 10, 2026
भारतीय महिला क्रिकेट संघाची माजी कर्णधार डायना एडुल्जी यांनीही या सन्मानाबद्दल कृतज्ञता व्यक्त केली. “हा केवळ माझाच नाही, तर सर्व महिला क्रिकेटपटूंचा सन्मान आहे,” असे त्या म्हणाल्या. एकनाथ सोलकर आणि दिलीप सरदेसाई यांच्या कुटुंबीयांच्या उपस्थितीने हा सोहळा अधिकच अर्थपूर्ण आणि भावनिक झाला.





