Arjun Tendulkar Prediction : अर्जुन तेंडुलकरची भविष्यवाणी ठरली खरी! KKRला हतबल करणाऱ्या मुकुल चौधरीबद्दल काय म्हणाला होता? पाहा VIDEO
Arjun Tendulkar Prediction : अर्जुन तेंडुलकरने आधीच वर्तवले भाकीत मुकुल चौधरीने खरे करुन दाखवले.

Arjun Tendulkar Prediction Mukul Choudhary : आयपीएल २०२६ च्या १५ व्या सामन्यात कोलकाता नाईट रायडर्स (KKR) विरुद्ध मुकुल चौधरीने जी ऐतिहासिक फटकेबाजी केली, त्याचे भाकीत मास्टर ब्लास्टर सचिन तेंडुलकरचा मुलगा अर्जुन तेंडुलकरने आधीच वर्तवले होते. ईडन गार्डन्सवर मुकुलने अशक्य वाटणारा विजय खेचून आणला आणि अर्जुनची भविष्यवाणी तंतोतंत खरी ठरली.
लखनौ सुपर जाएंट्सच्या २१ वर्षीय मुकुल चौधरीने केवळ २७ चेंडूंत नाबाद ५४ धावा कुटून केकेआरच्या तोंडचा घास हिरावला. मात्र, मुकुलच्या या प्रतिभेची कल्पना अर्जुन तेंडुलकरला आधीपासूनच होती. काही दिवसांपूर्वी शुभंकर मिश्राला दिलेल्या एका मुलाखतीत अर्जुनने मुकुलच्या फलंदाजीचे भरभरून कौतुक करताना तो आयपीएल २०२६ चा ‘सरप्राईज पॅकेज’ ठरेल, असे म्हटले होते. Arjun Tendulkar Prediction
काय म्हणाला होता अर्जुन तेंडुलकर? Arjun Tendulkar Prediction
Mukul Choudhary के बारे अर्जुन तेंदुलकर पहले ही भविष्यवाणी कर दिया था कि बहुत
अच्छा छक्का मारता है नेट्स में मुकुल चौधरी
आज सबने देख भी लिया#KKRvsLSG pic.twitter.com/MK01AU5Ch1— Aman Singh (@77_com7) April 9, 2026
मुलाखतीदरम्यान अर्जुनने मुकुलच्या ‘३६०-डिग्री’ फटकेबाजीचा उल्लेख केला होता. अर्जुन म्हणाला होता, “मुकुल चौधरी ( Mukul Choudhary) जबरदस्त षटकार मारतो. एका सराव सामन्यात मी त्याची फटकेबाजी जवळून पाहिली असून मी खरोखर प्रभावित झालो आहे. तो मैदानाच्या चारी बाजूंना फटके मारतो. मग ते स्क्वेअर लेग असो, पॉईंट असो, अपर कट असो वा गोलंदाजाच्या डोक्यावरून! त्याची फलंदाजी करण्याची क्षमता थक्क करणारी आहे.”
डेथ ओव्हर्समध्ये केकेआरचे गोलंदाज हतबल –
लढत शेवटच्या ४ षटकांत आली तेव्हा लखनऊला विजयासाठी ५४ धावांची गरज होती. समोर कॅमेरून ग्रीन, कार्तिक त्यागी आणि वैभव अरोरा यांसारखे अनुभवी गोलंदाज होते. मात्र, मुकुलने अर्जुनने वर्णन केल्याप्रमाणे आपल्या अतरंगी फटक्यांच्या जोरावर या गोलंदाजांची लाईन आणि लेन्थ विस्कळीत केली. ७ गगनचुंबी षटकार खेचत त्याने शेवटच्या चेंडूवर लखनऊला विजय मिळवून दिला. अर्जुनने सराव सामन्यात जे पाहिले होते, तेच मुकुलने ईडन गार्डन्सच्या मुख्य मंचावर करून दाखवले. Arjun Tendulkar Prediction





