पाटण – एका महिलेने एका अल्पवयीन मुलीच्या मतिमंदपणाचा गैरफायदा घेत बाहेर फिरायला नेऊन खाऊचे व पैसे देण्याचे आमिष दाखवून पाटण व परिसरातील लोकांची ओळख करून त्यांच्याशी शरीर संबंध ठेवण्यास भाग पाडले. या मतिमंद अल्पवयीन मुलीवर आठ संशयितांनी बलात्कार केल्याची घटना उघडकीस आल्याने संताप व्यक्त केला जात आहे. मुलीच्या आईने दिलेल्या तक्रारीवरून पाटण व परिसरातील नऊ जणांना पोलीसांनी अटक केली आहे. त्यातील आठजणांना दाह दिवसांची पोलीस कोठडी तर एका महिलेला चार दिवसांची पोलीस कोठडी सुनावण्यात आली आहे.
याबाबत पाटण पोलिसांकडून मिळालेल्या माहितीनुसार, एका महिलेने दि. 27 जानेवारी 2022 ते 18 फेब्रुवारी 2022 यादरम्यान तिच्या परिचयाच्या एका अल्पवयीन व मतिमंद मुलीला बाहेर फिरायला नेऊन खाऊ देण्याचे तसेच पैशांचे आमिष दाखवले. पाटण व परिसरातील लोकांशी ओळख करून दिली. त्यांच्याशी अल्पवयीन मुलीला शरीर संबंध ठेवण्यास भाग पाडले. या सर्व संशयितांपैकी आठ जणांनी या मुलीवर वेगवेगळ्या ठिकाणी नेऊन बलात्कार केला.