Rana Talwar Death – ग्लोबल बँकेचे प्रमुख राणा तलवार यांचे वयाच्या 76 व्या वर्षी निधन झाले. ते स्टँडर्ड चार्टर्ड बँकेचे सीईओ म्हणून कार्यरत होते. काही काळापासून त्यांची प्रकृती ठिक नव्हती. शनिवारी त्यांनी अखेरचा श्वास घेतला.
राणा तलवार हे जागतिक बँकेचे प्रमुख असलेले पहिले भारतीय होते. 1997 ते 2002 पर्यंत त्यांनी स्टँडर्ड चार्टर्ड बँकेचे सीईओ म्हणून काम केले. याआधी त्यांनी सिटीकॉर्प आणि सिटीबँकमध्ये कार्यकारी उपाध्यक्ष आणि धोरण समिती सदस्य म्हणून काम केले आहे.
राणा तलवार हे DLF, Asahi India Glass Limited आणि Great Eastern Energy Corporation Ltd सारख्या अनेक कंपन्यांचे बोर्ड सदस्य देखील राहिले आहेत. ते सेबर कॅपिटलचे संस्थापक अध्यक्ष आणि व्यवस्थापकीय भागीदार देखील होते.
राणा तलवार यांचा जन्म 1948 मध्ये झाला. दिल्ली विद्यापीठाच्या सेंट स्टीफन्स कॉलेजमध्ये त्यांनी शिक्षण घेतले. यानंतर त्यांनी सिटी बँकेतून करिअरला सुरुवात केली.