मुंबई – राखी सावंतचे आयुष्य बऱ्याच दिवसांपासून अडचणीत आहे. एकीकडे आईचे निधन झाले तर दुसरीकडे तिच्या वैवाहिक जीवनात भूकंप आला. असं असलं तरी राखी मीडियाला इंटरटेन करणं काही सोडत नाही. नुकतंच राखी पुन्हा एकदा आपल्या लग्नामुळे चर्चेत आली आहे. राखी सावंतचा एक नवीन व्हिडिओ समोर आला आहे, ज्यामध्ये ती तिच्या लग्नाचा उल्लेख करताना दिसत आहे.
पापाराजीने आपल्या इंस्टाग्राम अकाउंटवरून एक व्हिडिओ शेअर केला आहे. यामध्ये राखी सावंतने पिवळ्या रंगाचा लेहेंगा परिधान केलेला दिसत आहे. राखी खूप सुंदर दिसत आहे आणि खूप आनंदी देखील आहे. व्हिडिओमध्ये राखी डान्स करत गाणं देखील म्हणत आहे. ‘सबकी बारातें आयी…’ हे लग्नाचं गाणं यावेळी राखीने गायलं आहे.
बोलता बोलता राखी सावंत समोर असलेल्या सर्व माध्यम कर्मींना आपल्या लग्नाच्या वरातीत येण्याचं आमंत्रण देताना दिसत आहे. तुम्ही सर्वांनी माझ्या वरातील या.. हनिमूनला येऊ नका’ असं राखी यावेळी सर्वांना बोलते. राखीने एकदम लग्नाप्रमाणे गेटअप केल्याने सर्वच संभ्रमात पडलॆ आहेत. ड्रेस,ज्वेलरी,हेअरस्टाईल हे सर्व काही राखीने एका नव्या नवरीप्रमाणे केले आहे.
राखीला पुन्हा एकदा सजलेले पाहून नेटकऱ्यांनी तिच्यावर प्रश्नांचा भडीमार केला आहे. व्हिडिओवर अनेकांनी राखीला पुन्हा लग्न करत आहे का ? असा थेट सवाल देखील विचारला आहे. ‘पुन्हा चूक करू नको’ अशी कमेंट एका युजरने केली आहे. तर पुन्हा कोण जेलमध्ये जायला तयार झालं ? असा सवाल एका युजरने विचहराला आहे.
View this post on Instagram
कितीही कठीण प्रसंग आले तरी राखीची नौटंकी काही केल्या कमी होताना दिसत नाही. आता देखील ती लग्नाबाबत मस्करीमध्ये बोलली असली तरी नेटकऱ्यांनी त्यावर सिरीयस पद्धतीने कमेंट केल्याचे पाहायला मिळत आहे.