Raju Patil : “अडीच वर्षांनंतर मी पुन्हा आमदार होणार”; मनसे नेते राजू पाटलांनी व्यक्त केला विश्वास
Raju Patil : 2024 मध्ये बोगस मतदान झाल्याचा राजू पाटील यांचा दावा

Raju Patil : डोंबिवलीत मनसेने भाजपला मोठा राजकीय धक्का दिला आहे. काही दिवसांपूर्वी भाजपमध्ये प्रवेश केलेल्या असंख्य महिला पदाधिकारी आणि कार्यकर्त्यांनी पुन्हा एकदा मनसेत घरवापसी केली आहे. मनसे नेते राजू पाटील यांच्या उपस्थितीत हा पक्षप्रवेशाचा कार्यक्रम पार पडला. यावेळी कार्यकर्त्यांशी संवाद साधताना राजू पाटील यांनी 2024 च्या विधानसभा निवडणुकीतील मतदानावर गंभीर आरोप केला.
“2024 मध्ये बोगस मतदान झालं, हे आम्हाला सर्व समजत होतं, मात्र त्यावेळी काही करता आलं नाही,” असा दावा त्यांनी केला. तसेच आगामी काळात SIRच्या कामावर लक्ष केंद्रित करण्याचं आवाहन कार्यकर्त्यांना करत, “अडीच वर्षांनंतर मी पुन्हा आमदार होणार,” असा विश्वास राजू पाटील यांनी व्यक्त केला. दरम्यान, भाजपमध्ये प्रवेश केल्यानंतर अवघ्या काही दिवसांतच महिला पदाधिकारी आणि कार्यकर्त्यांनी पुन्हा मनसेत प्रवेश केल्याने डोंबिवलीच्या राजकारणात चर्चेला उधाण आलं आहे. Raju Patil
कल्याण ग्रामीण विधानसभा मतदारसंघातून 2019 सा राजू पाटील हे निवडून आले होते. राजू पाटील हे मनसेचे एकमेव आमदार होते. मात्र, 2024 च्या निवडुकीत मात्र राजू पाटील यांचा पराभव झाला होता. कल्याण मतदारसंघात ठाकरे गटाचे सुभाष भोईर, शिंदे गटाचे राजेश मोरे आणि मनसेचे राजू पाटील यांच्यात तिरंगी लढत पाहायला मिळाली होती. यामध्ये राजेश मोरे हे विजयी झाले होते. यानंतर आता राजू पाटील यांनी पुढच्या अडीच वर्षात मी आमदार होणार असल्याचा दावा केला आहे. Raju Patil
हेही वाचा:





