Sharad Pawar : MPSC पेपरफुटीचं भाजप आमदारावर खापर; शरद पवारांच्या ‘या’ आक्रमक नेत्यावर होणार कारवाई?
राज्यभरात गाजत असलेल्या MPSC पेपरफुटी प्रकरणात आता थेट राजकीय नेत्यांमध्ये संघर्ष पेटला असून, राष्ट्रवादी काँग्रेस शरद पवार (Sharad Pawar) गटाचे आक्रमक नेते मेहबूब शेख यांच्या अडचणीत मोठी वाढ झाली आहे.

Sharad Pawar : महाराष्ट्राच्या राजकीय वर्तुळातून एक मोठी आणि खळबळजनक बातमी समोर आली आहे. राज्यभरात गाजत असलेल्या MPSC पेपरफुटी प्रकरणात आता थेट राजकीय नेत्यांमध्ये संघर्ष पेटला असून, राष्ट्रवादी काँग्रेस शरद पवार (Sharad Pawar) गटाचे आक्रमक नेते मेहबूब शेख यांच्या अडचणीत मोठी वाढ झाली आहे.
भाजपचे आमदार अभिमन्यू पवार यांच्यावर MPSC पेपरफुटी प्रकरणात थेट संबंध असल्याचा गंभीर आरोप केल्यानंतर मेहबूब शेख यांच्याविरोधात लातूर जिल्ह्यातील औसा पोलिस ठाण्यात (Sharad Pawar) तक्रार दाखल करण्यात आली आहे.
गेल्या काही दिवसांपासून स्पर्धा परीक्षांमधील पेपरफुटी प्रकरण चांगलेच तापले असून पोलिसांनी या प्रकरणात आतापर्यंत ६ जणांना अटक केली आहे. या अटकेनंतर पेपरफुटीचे धागेदोरे थेट राजकीय वर्तुळाशी जोडले जात असल्याचा संशय व्यक्त करण्यात येत होता. याच मुद्द्यावरून मेहबूब शेख यांनी माध्यमांसमोर येत आक्रमक भूमिका घेतली होती.
एमपीएससी सुरुवातीला पेपरफुटी नाकारत असली, तरी आता ‘दूध का दूध आणि पाणी का पाणी’ झाले असल्याचे त्यांनी म्हटले होते. केवळ दलाल आणि ग्राहकांना पकडून चालणार नाही, तर या रॅकेटचा मुख्य मास्टरमाइंड आणि डिस्ट्रीब्युटर एमपीएससीच्या आतच नागासारखा ठाण मांडून बसला असल्याचा गंभीर आरोप त्यांनी केला होता. या संपूर्ण प्रकरणाशी भाजप आमदार अभिमन्यू पवार यांचे थेट कनेक्शन असल्याचा दावाही शेख यांनी जाहीरपणे केला होता.
या आरोपांनंतर राजकीय वातावरण चांगलेच तापले असून आमदार अभिमन्यू पवार यांच्या समर्थकाने औसा पोलिस ठाण्यात धाव घेत तक्रार नोंदवली आहे. आमदार पवारांचा या प्रकरणाशी काडीमात्र संबंध नसताना (Sharad Pawar) केवळ त्यांची राजकीय प्रतिमा मलिन करण्याच्या हेतूने ही खोटी आणि बदनामीकारक विधाने करण्यात आल्याचे तक्रारीत नमूद करण्यात आले आहे. या तक्रारीच्या आधारे पोलिसांनी चौकशी सुरू केली असून, आता पोलिस मेहबूब शेख यांच्यावर नेमकी काय कारवाई करणार याकडे संपूर्ण राज्याचे लक्ष लागले आहे.






