Benjamin Netanyahu : नेतन्याहू यांचा मोदींशी फोनवरून संवाद; इस्त्रायल भेटीचे दिले निमंत्रण
इस्त्रायलचे पंतप्रधान बेंजामिन नेतन्याहू (Benjamin Netanyahu) यांनी गुरूवारी पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्याशी दूरध्वनीवरून संवाद साधला. त्यावेळी त्यांनी मोदींना इस्त्रालय भेटीचे निमंत्रण दिले.

Benjamin Netanyahu : इस्त्रायलचे पंतप्रधान बेंजामिन नेतन्याहू (Benjamin Netanyahu) यांनी गुरूवारी पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्याशी दूरध्वनीवरून संवाद साधला. त्यावेळी त्यांनी मोदींना इस्त्रालय भेटीचे निमंत्रण दिले. इस्त्रायलच्या स्वातंत्र्यदिनी मोदींनी वीर भारतीय वैमानिक स्मित मच्छार समवेत मशाल प्रज्वलित करावी, अशी इच्छा नेतन्याहू यांनी व्यक्त केली.
सोशल मीडियावरून स्वत: मोदींनी नेतन्याहू (Benjamin Netanyahu) यांचा फोन कॉल आल्याची माहिती दिली. भारत आणि इस्त्रालयमधील संबंधांमध्ये होणाऱ्या प्रगतीचा आढावा आम्ही घेतला. तसेच, द्विपक्षीय भागीदारी आणखी मजबूत करण्याविषयीच्या वचनबद्धतेचा पुनरूच्चार केला.
पश्चिम आशियातील अलिकडच्या घटनाक्रमावर आम्ही चर्चा केली. तसेच, त्या क्षेत्रात तातडीने शांतता आणि स्थिरता स्थापित होण्याच्या गरजेवर भर दिला, असे मोदींनी नमूद केले. निमंत्रण दिल्याबद्दल मोदींनी आभार व्यक्त केले. तसेच, दोन्ही देशांमधील मजबूत संबंधांची प्रशंसा केली, असे नेतन्याहू यांनी म्हटले.
मोदींनी सर्वप्रथम जुलै २०१७ मध्ये इस्त्रायलचा दौरा केला. त्यानंतर चालू वर्षी फेब्रुवारीत त्यांनी दुसऱ्यांदा इस्त्रायलला भेट दिली. आता नेतन्याहू (Benjamin Netanyahu) यांचे निमंत्रण स्वीकारल्यास मोदी तिसऱ्यांदा त्या देशाचा दौरा करतील.






