Raj Thackeray: “पुढच्या 2-5 महिन्यात मोठी गडबड होईल,” राज ठाकरेंचा काल इशारा आता थेट व्हिडिओ केला शेअर
Raj Thackeray: सरकारला ही डॉक्युमेंट्री समाजमाध्यमांवरून गायब करायची- राज ठाकरे

Raj Thackeray: मनसे अध्यक्ष राज ठाकरे यांनी त्यांच्या सोशल मीडिया अकाऊंटवर व्हिडिओ शेअर केला आहे. ज्यातून त्यांनी केंद्र सरकारवर निशाणा साधला आहे. राज ठाकरे यांनी आपल्या फेसबुक अकाउंट वर पंतप्रधान नरेंद्र मोदी आणि उद्योजक गौतम अदाणी यांची डॉक्युमेंट्री फिल्म पोस्ट केली आहे.
या डॉक्युमेंट्री फिल्मच्या संदर्भात एक्स या सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवरील अनेकांना मुंबई पोलिसांनी ही डॉक्युमेंट्री हटवण्याच्या संदर्भात नोटीस देण्यात आली होती.
या डॉक्युमेंट्रीमध्ये पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी वेळोवेळी उद्योजक गौतम अदाणी यांना कसा पाठिंबा देऊन त्यांना उद्योग क्षेत्रात मोठं केलं. तसेच त्यांचा फायदा आपल्या राजकारणासाठी केला याचा उल्लेख या डॉक्युमेंट्रीमध्ये आहे. या सर्व प्रकरणानंतर आता मनसे अध्यक्ष राज ठाकरे यांच्याकडून ही डॉक्युमेंट्री सोशल मीडियावर पोस्ट करण्यात आली आहे.
सरकारला ही डॉक्युमेंट्री समाजमाध्यमांवरून गायब करायची आहे. याचं कारण काय असेल ते तुम्हाला ही डॉक्युमेंट्री बघितल्यावर कळेलच. त्यामुळे सरकारने ही डॉक्युमेंट्री गायब करायच्या आधी बघून घ्या ! https://t.co/G7iQBbC88J
— Raj Thackeray (@RajThackeray) October 22, 2026
राज ठाकरे यांनी हा व्हिडिओ पोस्ट करून म्हटलं की, ‘सरकारला ही डॉक्युमेंट्री समाजमाध्यमांवरून गायब करायची आहे. याचं कारण काय असेल ते तुम्हाला ही डॉक्युमेंट्री बघितल्यावर कळेलच. त्यामुळे सरकारने ही डॉक्युमेंट्री गायब करण्याच्या आधी बघून घ्या, असं आवाहन राज यांनी लोकांना केले आहे.
राज ठाकरे काय म्हणाले होते?
काल पत्रकार परिषदेत राज ठाकरेंनी म्हंटले की, “देशात पुढच्या 2-5 महिन्यात काहीतरी मोठी गडबड होईल. छोटा काळ असा येईल, जेव्हा देशाला पंतप्रधान नसेल. एपस्टिन बरोबरचा फोटो बाहेर आला आहे, खूप गोष्टी बाहेर येणार आहे, हे थांबणार नाही. सरकार चुकांवर चुका करत राहणार आणि ही गोष्ट थांबणार नाही. येत्या काही वर्षात देश रस्त्यावर आला तर नवल वाटणार नाही,”अशा शब्दात ठाकरेंनी भाकीत केले.
पुढे ते म्हणाले, “आंदोलनात अराजकता कुठे आली, शांततेने आंदोलन करणाऱ्यांवर तुम्ही लाठीचार्ज केला. त्या मुलांनी काहीच केले नव्हते. भाजप जुने दिवस विसरले काय? पुढच्या वेळेस त्यांचे छायाचित्र लावा,” असे म्हणत ठाकरेंनी आंदोलकांची बाजू घेतली. यावेळी त्यांनी पाकिस्तान, बांग्लादेश, नेपाळ इथे बॅलेट पेपरवर मतदान होतात. पुढारलेला देश आहे, तिथे बॅलेटवरच मतदान होते, असे म्हणत ठाकरेंनी बॅलेट पेपरवर मतदान घेण्याची मागणी केली.
हेही वाचा:





