Narendra Modi : ब्रिक्स देशांच्या संसदेचे राजधानीत होणार संमेलन; पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या हस्ते होणार उद्घाटन
ब्रिक्स देशांच्या संसदेचे 12 वे संमेलन २६ आणि २७ ऑक्टोबर रोजी संविधान सदनच्या सेंट्रल हॉलमध्ये आयोजित करण्यात आले आहे. पंतप्रधान नरेंद्र मोदी (Narendra Modi) संमेलनाचे उद्घाटन करतील.

Narendra Modi : ब्रिक्स देशांच्या संसदेचे 12 वे संमेलन २६ आणि २७ ऑक्टोबर रोजी संविधान सदनच्या सेंट्रल हॉलमध्ये आयोजित करण्यात आले आहे. पंतप्रधान नरेंद्र मोदी (Narendra Modi) संमेलनाचे उद्घाटन करतील. ब्रिक्स देशांच्या संसदेला लोकाभिमूख कारभार करण्यास अधिकाधिक सक्षम बनविण्यासाठी 21 देशांचे लोकप्रतिनिधी दिल्लीत विचार विनिमय करणार आहेत.
लोकसभेचे अध्यक्ष ओम बिर्ला यांनी पत्रकारांशी बोलताना सांगितले की, या संमेलनाला ब्रिक्सचे सदस्य आणि भागीदार देशांचे पीठासीन अधिकारी आणि लोकप्रतिनिधी यांच्यासह केंद्रीय मंत्री, राज्यसभेचे उपसभापती तसेच राज्य विधानमंडळांचे पीठासीन अधिकारी उपस्थित राहणार आहेत. “जन-केंद्रित विकासासाठी संसदेला सशक्त करणे” ही यावेळची (Narendra Modi) थीम आहे.
या संमेलनात लवचिकता: उत्तम भविष्य सुनिश्चित करण्यासाठी संस्थांना बळकट करण्यामध्ये संसदेची महत्त्वपूर्ण भूमिका
नवोन्मेष: संसदेच्या माध्यमातून कृत्रिम बुद्धिमत्ता आणि डिजिटल तंत्रज्ञानाच्या क्षेत्रात मानवकेंद्रित नवोन्मेषाला प्रोत्साहन देणे
सहकार्य: संसदीय सहकार्याच्या माध्यमातून अधिक प्रतिनिधिक जागतिक शासन प्रणाली सुनिश्चित करणे
शाश्वतता: आपल्या देशांसाठी शाश्वत आणि सर्वसमावेशक भविष्य सुनिश्चित करण्यामध्ये संसदेची भूमिका अशा चार मुद्यांवर चर्चा केली जाणार आहे.
बिर्ला यांनी सांगितले की, बिक्स आणि भागीदार देशांच्या मैत्रीगटात सामील खासदारांना बोलाविण्यात आले आहे. संसदेने नेमलेल्या देशनिहाय मैत्रीगटात महाराष्ट्रातील अनेक खासदार आहेत. डॉ. श्रीकांत शिंदे (इंडोनेशिया) आणि प्रफुल्ल पटेल (ब्राझिल) या ब्रिक्स देशांच्या मैत्रीगटाचे प्रमुख आहेत.
तर भागीदार (Narendra Modi) देशांच्या मैत्रीगटाचे सदस्य डॉ. अजित गोपछडे (सौदी अरेबिया), धैर्यशील माने (ब्राझिल) आणि धैर्यशील मोहिते पाटील (यूएई), सुरेश म्हात्रे आणि श्यामकुमार बर्वे (इराण), संदीपन भुमरे (इंडोनेशिया), डॉ. हेमंत सावरा (मलेशिया), डॉ. कल्याण काळे, अमोल कोल्हे, नारायण राणे (वियतनाम), प्रतिभा धानोरकर आणि बजरंग सोनवने (उजबेकिस्तान) यांचा समावेश आहे.






