क्रिकेट विश्वात मोठी खळबळ! RCB नंतर आता ‘हा’ संघही IPL 2026 पूर्वी विकला जाणार, जाणून घ्या कोणता आहे?

Rajasthan Royals likely to get new owners : भारतीय क्रिकेट जगतात मोठी खळबळ उडाली आहे. आयपीएल २०२६ च्या आधी दोन मोठ्या फ्रँचायझींचे मालक बदलण्याची शक्यता आहे. आयपीएल २०२५ चे चॅम्पियन रॉयल चॅलेंजर्स बंगळूरच्या मालकीमध्ये बदल झाला आहे, तर आता राजस्थान रॉयल्स (RR) संघही विकला जाण्याच्या तयारीत आहे. या बातम्यांमुळे क्रिकेट विश्वात मोठी खळबळ माजली आहे.
एलएसजीचे मालक संजीव गोयंका यांचे मोठे बंधू आणि प्रसिद्ध उद्योगपती हर्ष गोयंका यांच्या एका पोस्टनंतर ही चर्चा सुरू झाली. हर्ष गोयंका यांनी गुरुवारी (२७ नोव्हेंबर) एक्सवर पोस्ट करत म्हटले की, “ऐकिवात आले आहे की, दोन आयपीएल संघ विकले जात आहेत. ते आरसीबी आणि राजस्थान रॉयल्स असतील. सध्याच्या उच्च मूल्यांकनाचा फायदा मालक उठवू इच्छित आहेत, असे दिसते. दोन संघ आणि ४-५ संभाव्य खरेदीदार! नवीन मालक पुणे, अहमदाबाद, मुंबई, बंगळूरू की अमेरिकेतून असेल, हे पाहणे उत्सुकतेचे ठरेल.”
I hear, not one, but two IPL teams are now up for sale- RCB and RR. It seems clear that people want to cash in the rich valuations today. So two teams for sale and 4/5 possible buyers! Who will be the successful buyers- will it be from Pune, Ahmedabad, Mumbai, Bengaluru or USA?
— Harsh Goenka (@hvgoenka) November 27, 2025
आरसीबीची मालकी बदलली –
आयपीएल २०२५ जिंकल्यानंतरही, आरसीबीचे सध्याचे मालक ‘डियाजिओ’ (Diageo) आणि त्यांची भारतीय उपकंपनी यूएसल यांनी ५ नोव्हेंबर रोजी संघ विकण्याची प्रक्रिया सुरू केल्याची औपचारिक घोषणा केली होती. सूत्रांनुसार, होम्बेल फिल्म्स (Hombale Films), जे ‘केजीएप’ आणि ‘कांतारा’ सारख्या ब्लॉकबस्टर चित्रपटांसाठी प्रसिद्ध आहेत, त्यांनी आरसीबी फ्रँचायझीच्या नवीन मालकांपैकी एक म्हणून अधिग्रहण निश्चित केले आहे.
हेही वाचा – SMAT 2025 : धोनीच्या शिष्याने अभिषेकला एकाच सामन्यात दोनदा केले आऊट! सुपर ओव्हरमध्ये मिळवून दिला शानदार विजय
याशिवाय, निखिल कामत (Zerodha), टी.व्ही. मोहनदास पै (माजी इन्फोसिस CFO) आणि आदर पूनावाला (सीरम इन्स्टिट्यूटचे CEO) यांचे संभाव्य ‘कन्सोर्टियम’ (Consortium) देखील बोली लावण्याच्या तयारीत आहे. सेबीच्या नियमांनुसार, ही विक्री प्रक्रिया ३१ मार्च २०२६ पर्यंत पूर्ण केली जाईल.
हेही वाचा – Ayush Mhatre Century : कर्णधारपद मिळताच आयुष म्हात्रेनं ठोकलं तुफानी शतक; मुंबईचा विदर्भावर दणदणीत विजय!
राजस्थान रॉयल्सही नवीन मालकांच्या शोधात –
रिपोर्ट्सनुसार, राजस्थान रॉयल्सची ६५% भागीदारी रॉयल्स स्पोर्ट्स ग्रुप (Emerging Media Sporting Holdings Limited) कडे आहे. आता ही फ्रँचायझी देखील नवीन गुंतवणूकदार किंवा मालकांच्या शोधात आहे. लाचलैन मर्डोक आणि रेडबर्ड कॅपिटल पार्टनर्स यांसारखे मोठे गुंतवणूकदारही यात अल्प प्रमाणात भागिदार आहेत. या उच्च मूल्यांकनाच्या काळात दोन्ही संघांच्या मालकांनी हा निर्णय घेतल्याने, आयपीएल फ्रँचायझींच्या बाजारमूल्याबद्दल मोठी चर्चा सुरू झाली आहे.





