Ayush Mhatre Century : कर्णधारपद मिळताच आयुष म्हात्रेनं ठोकलं तुफानी शतक; मुंबईचा विदर्भावर दणदणीत विजय!

विदर्भाची दमदार फलंदाजी –
विदर्भ आणि मुंबई यांच्यात झालेल्या या सामन्यात विदर्भाने प्रथम फलंदाजी करताना २० षटकांत ९ गडी गमावून १९२ धावांचा मोठा डोंगर उभारला होता. विदर्भाकडून अथर्व तायडेने केवळ ३६ चेंडूंमध्ये ६४ धावांची दमदार खेळी केली, तर अमन मोखाडेने ३० चेंडूंत ६१ धावा चोपल्या.
रहाणे लवकर बाद, पण म्हात्रेने सांभाळला मोर्चा –
Maiden T20 Century in style 🔥#SMAT #Ayushmhatre
🎥 @DhruvaPrasad9pic.twitter.com/ONDDT5gZgg— WhistlePodu Army ® – CSK Fan Club (@CSKFansOfficial) November 28, 2025
प्रत्युत्तरादाखल १९३ धावांच्या मोठ्या लक्ष्याचा पाठलाग करताना मुंबईची सुरुवात खराब झाली. कर्णधार अजिंक्य रहाणे अवघ्या दोन चेंडूंमध्ये शून्यावर बाद झाला, तर हार्दिक तैमोरही एका धावेवर बाद झाला. या कठीण परिस्थितीत सलामीवीर आयुष म्हात्रेने एक टोक सांभाळले आणि जबरदस्त फलंदाजी केली. दोन विकेट्स लवकर पडल्यानंतर त्याला सूर्यकुमार यादवची साथ मिळाली. सूर्यकुमार यादव ३० चेंडूंमध्ये ३५ धावा करून बाद झाला, पण म्हात्रेने आपला आक्रमक पवित्रा कायम ठेवला.
हेही वाचा – MS Dhoni Dinner : धोनीकडून विराटचा खास पाहुणचार! डिनरनंतर ‘माही’ने स्वतः कोहलीला हॉटेलवर सोडले, पाहा VIDEO
आयुष म्हात्रेने ठोकले वादळी शतक –
आयुष म्हात्रेने अवघ्या २५ चेंडूंमध्ये आपले अर्धशतक पूर्ण केले आणि त्यानंतर केवळ ४९ चेंडूंमध्ये शतक झळकावले. अखेरच्या षटकांमध्ये शिवम दुबेने १९ चेंडूंमध्ये ३९ धावांची तुफानी खेळी करत मुंबईचा विजय सोपा केला. मुंबईने हा सामना १७.५ षटकांत ३ गडी गमावून १९४ धावा करत आपल्या नावावर केला.
दरम्यान आयुष म्हात्रे शेवटपर्यंत नाबाद राहिला. त्याने ५३ चेंडूंमध्ये ८ चौकार आणि ८ षटकारांच्या मदतीने ११० धावा कुटल्या. आयुष म्हात्रेची आजच अंडर-१९ आशिया कपसाठी कर्णधार म्हणून निवड झाली असल्याने, त्याने हे शतक ठोकून आपला फॉर्म सिद्ध केला आहे.





