Anshul Kamboj Twice Dismisses Abhishek Sharma : सय्यद मुश्ताक अली ट्रॉफी २०२५ च्या ग्रुप सी मध्ये हरियाणा आणि पंजाब यांच्यात एक अत्यंत रोमांचक सामना पाहायला मिळाला. अभिषेक शर्माच्या नेतृत्वाखालील पंजाबच्या संघाला या सामन्यात पराभवाचा सामना करावा लागला. विशेष म्हणजे, अभिषेक शर्मा या सामन्यात पूर्णपणे अपयशी ठरला. त्याला हरियाणाच्या अंशुल कंबोजने त्याला एकाच सामन्यात दोनदा बाद करून सर्वांचे लक्ष वेधून घेतले. हा सामना सुपर ओव्हरपर्यंत गेला, जिथे हरियानाने बाजी मारली अभिषेक शर्मा एकाच सामन्यात दोनदा बाद – फलंदाज म्हणून अभिषेक शर्मा या सामन्यात पूर्णपणे फ्लॉप ठरला. पंजाबला सामना जिंकण्यासाठी २०८ धावांचे मोठे लक्ष्य मिळाले होते, परंतु अभिषेक केवळ ५ चेंडूंमध्ये ६ धावा काढून अंशुल कंबोजचा शिकार झाला. आयपीएलमध्ये सीएसकेचा स्टार गोलंदाज असणाऱ्या कंबोजने त्याला क्लीन बोल्ड केले. यानंतर सामना टाय झाल्यानंतर सुपर ओव्हरमध्येही याच दोन खेळाडूंचा सामना झाला आणि पुन्हा एकदा कंबोजनेच बाजी मारली. अंशुलने सुपर ओव्हरमध्ये अभिषेकला खातेही उघडू दिले नाही आणि पॅव्हेलियनचा रस्ता दाखवला. सामन्यात चौकार-षटकारांची आतिषबाजी – या सामन्यात दोन्ही संघांकडून चौकार-षटकारांचा जोरदार पाऊस पाहायला मिळाला. हरियाणाने प्रथम फलंदाजी करताना २० षटकांत ९ गडी गमावून २०७ धावा केल्या. कर्णधार अंकित कुमारने केवळ २६ चेंडूंमध्ये ५ चौकार आणि ४ षटकारांसह ५१ धावांची आक्रमक खेळी साकारली. तसेच निशांत सिंधूने ३२ चेंडूंमध्ये ८ चौकार आणि ३ षटकारांच्या मदतीने ६१ धावा कुटल्या. पंजाबकडून अश्विनी कुमारने सर्वाधिक ३ विकेट्स घेतल्या. प्रत्त्युत्तरादाखल २०८ धावांच्या लक्ष्याचा पाठलाग करताना पंजाबकडूनही शानदार फलंदाजी पाहायला मिळाली. अनमोलप्रीत सिंगने ३७ चेंडूंमध्ये ८१ धावा करून संघाला विजयाच्या जवळ नेले, तर संवीर सिंग १६ चेंडूंमध्ये ३० धावांवर नाबाद राहिला. हेही वाचा – Ayush Mhatre Century : कर्णधारपद मिळताच आयुष म्हात्रेनं ठोकलं तुफानी शतक; मुंबईचा विदर्भावर दणदणीत विजय! सुपर ओव्हरमध्ये अंशुल कंबोजची कमाल- या सामन्याचा खरा नायक ठरला अंशुल कंबोज ठरला. त्याने ४ षटकांत २६ धावा देत २ विकेट्स घेतल्या. त्यानंतर सुपर ओव्हरमध्ये कम्बोजने फक्त ३ चेंडूंमध्ये १ धाव खर्च करून २ विकेट्स मिळवल्या. यानंतर हरियाणाने पहिल्याच चेंडूवर चौकार मारून सामना जिंकला आणि अंशुल कम्बोज हरियाणाच्या विजयाचा सर्वात मोठा हिरो ठरला.