मनसे अध्यक्ष राज ठाकरे ( Raj Thackeray ) यांनी उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांना पत्र लिहून अंधेरी विधानसभा पोटनिवडणूक न लढवण्याची विनंती केली आहे. कारण याठिकाणचे दिवंगत शिवसेना आमदार रमेश लटके यांच्या निधनानंतर आता त्यांच्या पत्नी ऋतुजा लटके या निवडणुकीत शिवसेना ठाकरे गटाकडून उभा राहणार आहेत. अशा वेळी राज ठाकरे यांनी महाराष्ट्राच्या संस्कृतीची आठवण करून देत देवेंद्र फडणवीसांना अशी विनंती केली आहे. त्यामुळे आता अंधेरी पूर्व विधानसभा पोटनिवडणुकीत राज ठाकरे हे ऋतुजा लटकेंना पाठिंबा जाहीर करणार की नाही? असा तर्कवितर्क लावला जात आहे.
राज ठाकरे ( Raj Thackeray ) यांच्या या विनंती पत्रावर भाजप व उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस काय प्रतिक्रिया देणार याकडे सर्वांचे लक्ष लागले होते. त्यावर फडणवीस म्हणाले की,”राजे ठाकरे यांच्या विनंतीचा आम्ही सन्मान करतो. मात्र हा निर्णय पक्षातील सर्व सहकारी आणि एकूणच पक्षाच्या विचारानेच घेतला जाईल. त्याचबरोबर राज यांच्या विनंती पत्रावर गांभीर्याने विचार करू.” असे देखील त्यांनी म्हटले आहे.
दरम्यान, राज ठाकरे ( Raj Thackeray ) हे शिवसेनेला म्हणजे ठाकरे गटाला पाठिंबा देणार का? असे अरविद सावंत यांना विचारले असता ते म्हणाले की, “अंधेरी पोटनिवडणुकीसाठी राज ठाकरे यांनी ऋतुजा लटके यांना पाठिंबा द्यावा की नाही हा त्यांच्या प्रश्न आहे. त्यांनी चांगली भूमिका मांडली मात्र ही भूमिका मांडण्यास थोडा उशीर केला. तरीदेखील त्यांचे हे विचार स्वागतार्ह आहेत. राज ठाकरे यांनी महाराष्ट्राच्या संस्कृतीची भाजपला आठवण करून दिली त्याबाद्दल त्यांचे आभार.” असे देखील सावंत यांनी म्हटले आहे.
Andheri By-Election: राज ठाकरेंच्या पत्रावर प्रवीण दरेकरांची स्पष्ट प्रतिक्रिया; म्हणाले – “आमचा उमेदवार विजयी होणार” https://t.co/VkA84mZrTT
— Digital Prabhat (@Dainik_Prabhat) October 16, 2022