आज मुंबईत “मोदीराज” ! पहिल्यांदाच नरेंद्र मोदी, राज ठाकरे एकाच व्यासपीठावर

Narendra Modi-Raj Thackeray। लोकसभा निवडणुकीच्या पाचव्या टप्प्याचे मतदान येत्या २० मे रोजी पार पडणार आहे. त्याचा प्रचार उद्या संपणार आहे. त्यासाठी आज मुंबईत सभांचा धडाका असणार आहे. त्यातच मुंबईत अन् राज्यात पहिल्यांदाच मोदीराज पाहायला मिळणार आहे पंतप्रधान नरेंद्र मोदी आणि राज ठाकरे प्रथमच एकाच व्यासपीठावर असणार आहेत.
पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या उपस्थितीत महायुतीची आज सभा पार पडणार आहे. या सभेत मुख्यमंत्री एकनाथ शिंदे, उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस, अजित पवार, मनसे अध्यक्ष राज ठाकरे उपस्थित राहणार आहेत. ही सभा शिवाजी पार्कवर होणार आहे.
इंडिया आघाडीची सभा Narendra Modi-Raj Thackeray।
तर दुसरीकडे महायुतीबरोबर मविआच्या बड्या नेत्यांची आज सभा होत आहे. या सभेला इंडिया आघाडीचे नेते उपस्थित राहणार आहे. काँग्रेस अध्यक्ष मल्लिकार्जुन खरगे, राष्ट्रवादी काँग्रेस शरदचंद्र पवार पक्षाचे अध्यक्ष शरद पवार, शिवसेना उबाठाचे पक्षप्रमुख उद्धव ठाकरे, आपचे नेते अरविंद केजरीवाल उपस्थित राहणार आहेत. ही सभा संध्याकाळी सहा वाजता बीकेसी मैदानावर होणार आहे. या सभेला राहुल गांधी उपस्थित राहणार नाही.
यामुळे राहुल गांधी सभेला नसणार Narendra Modi-Raj Thackeray।
इंडिया आघाडीच्या सभेला काँग्रेस नेते राहुल गांधी नसणार आहे. राहुल गांधी रायबरेली मतदार संघातून निवडणूक लढवत आहे. त्या ठिकाणी २० मे रोजी मतदान आहे. यामुळे या सभेला राहुल गांधी येणार नाही. परंतु १८ मे रोजी इंडिया आघाडी संयुक्त पत्रकार परिषद होणार आहे.
पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या सभेच्या पार्श्वभूमीवर दादर परिसरात वाहतुकीत बदल करण्यात आला आहे. दादर परिसरात अनेक ठिकाणी वाहनांसाठी नो पार्किंग झोन असणार आहे. मुख्य मार्गावर वाहतुकीत करण्यात आला आहे. शुक्रवारी दादरमधील अनेक रस्ते गरजेनुसार वाहतुकीसाठी बंद राहणार आहे. सावरकर मार्ग, केळुस्कर रोड, केळकर मार्ग या रस्त्यावर पार्किंग करता येणार नाही. सभेसाठी येणाऱ्या वाहनांसाठी देखील विशेष पार्किंग व्यवस्था करण्यात आली आहे.
हेही वाचा





