‘राज ठाकरेंचे ४ जून नंतर सुपारीचे दुकान पूर्णपणे बंद होईल. जनताच हे दुकान बंद करेल’

Lok Sabha Election 2024 । लोकसभा निवडणुकीच्या पाचव्या टप्प्याचे मतदान येत्या २० मे रोजी पार पडणार आहे. त्याचा प्रचार उद्या संपणार आहे. त्यासाठी आज मुंबईत सभांचा धडाका असणार आहे. त्यातच मुंबईत अन् राज्यात पहिल्यांदाच पंतप्रधान नरेंद्र मोदी आणि राज ठाकरे प्रथमच एकाच व्यासपीठावर असणार आहेत.
पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या उपस्थितीत महायुतीची आज सभा पार पडणार आहे. या सभेत मुख्यमंत्री एकनाथ शिंदे, उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस, अजित पवार, मनसे अध्यक्ष राज ठाकरे उपस्थित राहणार आहेत. ही सभा शिवाजी पार्कवर होणार आहे. या सभेवरून ठाकरे गटाचे नेते संजय राऊत यांनी निशाणा साधला आहे.
संजय राऊत यांनी राज ठाकरेंवर खोचक टीका…
‘राज ठाकरे यांची एक विशेषता आहे. ज्यांच्यावर ते प्रश्न उपस्थित करतात, त्यांच्याबरोबरच ते जातात. उत्तर भारतीयांविरोधात त्यांनी आंदोलन सुरू केल्यानंतर भाजपाने त्यांच्याशी नाते तोडले होते. मात्र आज पंतप्रधान नरेंद्र मोदी त्यांच्याबरोबर बसणार आहेत. एक राजकीय अनैतिकता सध्या दिसत आहे. राज ठाकरेंचे ४ जून नंतर सुपारीचे दुकान पूर्णपणे बंद होईल. जनताच हे दुकान बंद करेल.’
संजय राऊत यांनी देवेंद्र फडणवीस यांच्यावर केली सडकून टीका…
‘महाराष्ट्रात देवेंद्र फडणवीस यांच्या विरोधात वातावरण आहे. भाजपचे सर्वाधिक नुकसान फडणवीसांमुळे होणार आहे. ते पुढे म्हणाले, गौतम अदानींना जमीन विकण्यासाठी 370 काढण्यात आल्या आहेत, अदानी हा भाजपचा सर्वात मोठा फायनान्सर आहे. महाराष्ट्रात भाजपची युती संपली आहे.’ असेही ते म्हणाले आहे.
हे वाचाल का ? मुंबई क्राईम ब्रँचची मोठी कारवाई..! घाटकोपर दुर्घटनाप्रकरणातील आरोपी भावेश भिंडे उदयपूर येथून अटक





