Thackeray Brothers Alliance | मुंबई महानगरपालिका निवडणुकीत उद्धव ठाकरेंची शिवसेना आणि राज ठाकरेंची मनसे एकत्र लढणार असल्याचे जवळपास निश्चित झाले आहे. गेल्या अनेक दिवसांपासून प्रतीक्षा असलेल्या शिवसेना व मनसेच्या युतीची घोषणा उद्धव ठाकरे व मनसेप्रमुख राज ठाकरे हे संयुक्त पत्रकार परिषदेत आज (बुधवारी) करणार आहेत. या पार्श्वभूमीवर उद्धव ठाकरे कुटुंबासह राज ठाकरे यांच्या शिवतीर्थ या निवासस्थानी दाखल झाले होते. येथून ते बाळासाहेब ठाकरे यांच्या स्मृतीस्थळावर पोहचले असून ठाकरे बंधुंनी बाळासाहेब ठाकरे यांना अभिवादन केले. यावेळी त्यांच्यासोबत रश्मी ठाकरे, आदित्य ठाकरे, खासदार अरविंद सावंत, बाळा नांदगावकर आदी नेते उपस्थित होते. यानंतर ठाकरे बंधु वरळी येथे संयुक्त पत्रकार परिषदेत युतीची घोषणा केली जाणार आहे. उद्धव ठाकरे आणि राज ठाकरे पहिल्यांदाच राजकीय युती करत असल्याने दोन्ही पक्षातील कार्यकर्त्यांमध्ये उत्साहाचे वातावरण आहे. वरळीतील ब्ल्यू सी हॉटेलमध्ये उद्धव ठाकरे आणि राज ठाकरे यांची संयुक्त पत्रकार परिषद होत आहे. या पत्रकार परिषदेत उद्धवसेना-मनसे युतीची अधिकृत घोषणा होणार आहे. सध्या दोन्ही पक्षातील कार्यकर्त्यांमध्ये आनंदाचे वातावरण पाहायला मिळत आहे. Thackeray Brothers Alliance | जागावाटपाचा फॉर्म्युला मुंबईतील एकूण २२७ जागांपैकी उद्धव ठाकरेंच्या शिवसेनेला १३० ते १३५, मनसेला ७० ते ७५, तर राष्ट्रवादीला १८ ते २० जागा मिळण्याची शक्यता आहे. Thackeray Brothers Alliance | हेही वाचा: बांगलादेशमध्ये कट्टरपंथीयांनी हिंदूंची जाळली घरे ; ७ वर्षांच्या चिमुकलीचा होरपळून मृत्यू