Parbhani Rain | परभणी जिल्ह्यात पहाटे झालेल्या मुसळधार पाऊस झाल्याने जनजीवन विस्कळीत झाले आहे. मुसळधार पावसामुळे अनेक वस्त्यांमध्ये घरात पाणी शिरले. तर शहरासह जिल्ह्यातील शेत शिवार पुन्हा पाण्याखाली गेले. अनेकांच्या घरात पाणी शिरल्याने नागरिकांचे संसार उपयोगी साहित्य भिजून नुकसान झाले आहे. पहाटे ४ वाजल्यापासून अवकाळी व अतिवृष्टीच्या स्वरूपात मुसळधार पाऊस झाल्याने परभणी तालुक्यातील पेडगाव, कुंभारी, कारला, आव्हाडवाडी, किनोळा, आर्वी, कास्टगाव, पिंपळगाव, गोविंदपूर, वाडी व परिसरातील अनेक गावांमध्ये पाणी शिरले आहे. परिणामी शेतकरी आणि नागरिकांना प्रचंड गैरसोयीचा सामना करावा लागला. परभणी शहरातील प्रमुख रस्ते आणि बाजारपेठा जलमय झाले आहेत. सोयाबीन आणि कापसाचे पीकही वाहून गेले दरम्यान, ग्रामीण भागात सोयाबीन आणि कापसाचे पीकही या मुसळधार पावसात पूर्णपणे वाहून गेले आहे. सोयाबीन वाचवण्यासाठी शेतकऱ्यांनी मांडी एवढ्या पाण्यातून सोयाबीनचे पोते बाहेर काढले. अनेक शेतांमध्ये पिकांच्या ऐवजी आता पाण्याचे तळे दिसत असून, शेतकरी आर्थिकदृष्ट्या पूर्णपणे कोलमडून गेला आहे. गेल्या काही दिवसांपासून अनियमित पावसामुळे त्रस्त असलेल्या शेतकऱ्यांच्या पिकांना आणखी झटका बसला आहे. त्यामुळे शेतकऱ्यांची चिंता अधिकच वाढली आहे. Parbhani Rain | हेही वाचा: ओसामा बिन लादेनची आठवण काढत ट्रम्प दुःखी ; म्हणाले,”ओसामा नावाचा एक माणूस…”