Shaktipeeth Expressway : शक्तीपीठमुळे शेतकऱ्यांच्या रोजीरोटीवर परिणाम; ‘या’ नेत्याचा सरकारवर गंभीर आरोप
महाराष्ट्र-गोवा शक्तीपीठ द्रुतगती महामार्ग (Shaktipeeth Expressway) प्रकल्पासाठी शेतकऱ्यांच्या जमिनी अधिग्रहित करून राज्य सरकार शेतकऱ्यांची रोजीरोटी हिरावून घेत असल्याचा आरोप ठाकरेसेनेचे खासदार संजय जाधव यांनी केला.

Shaktipeeth Expressway : महाराष्ट्र-गोवा शक्तीपीठ द्रुतगती महामार्ग (Shaktipeeth Expressway) प्रकल्पासाठी शेतकऱ्यांच्या जमिनी अधिग्रहित करून राज्य सरकार शेतकऱ्यांची रोजीरोटी हिरावून घेत असल्याचा आरोप ठाकरेसेनेचे खासदार संजय जाधव यांनी केला. जाधव हे परभणीमध्ये या प्रकल्पाविरुद्ध शेतकऱ्यांच्या आंदोलनाचे नेतृत्व करत आहेत.
बीड जिल्ह्यातील काही भागातही याविरूद्ध आंदोलने करण्यात आली. ८६,३०० कोटी रुपयांचा नागपूर-गोवा शक्तीपीठ द्रुतगती महामार्ग (Shaktipeeth Expressway) ८१० किलोमीटर लांबीचा आहे. तो महाराष्ट्रातील १२ जिल्ह्यांमधून जाणार आहे. नागपूर आणि गोवा दरम्यानचा प्रवास वेळ ८ तासांपर्यंत कमी करण्याचा याचा उद्देश आहे.
खासदार जाधव यांनी आरोप केला की, सरकार द्रुतगती महामार्गासाठी जमीन अधिग्रहण करत आहे. ज्यामुळे अदानींना विदर्भ ते गोवा खनिज वाहतूक करण्यास मदत होईल. या जमिनी शेतकऱ्यांच्या वडिलोपार्जित संपत्ती आहेत. प्रकल्पासाठी त्या संपादित करून सरकार शेतकऱ्यांना उपजीविका देणारी जमीन हिरावून घेतली जात आहे.
सरकार निविदा काढून अदानींना खाऊ घालू इच्छिते जेणेकरून ते सहजपणे खनिज वाहतूक करू शकतील. राज्यातील रस्त्यांचे रूप पालटले असताना नवीन एक्सप्रेस वेची गरज काय असा प्रश्न त्यांनी केला.
उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांच्यावर टीका करताना ते म्हणाले, शिंदे यांनी आधी शक्तीपीठ प्रकल्प रद्द करणार असल्याचे म्हटले होते, ते आज काय करत आहेत? ते शिवसैनिक आहेत, लोकांसाठी संघर्ष करण्याची शिवसेनाप्रमुख बाळासाहेब ठाकरेंची शिकवण ते विसरले आहेत का? राज्य सरकार भ्रष्टाचार करण्यासाठी असे महामार्ग बांधत असल्याचा त्यांनी दावा केला. शेतकऱ्यांनी त्यांची जमीन या महामार्गासाठी दिल्यास त्यांना तुटपुंजी भरपाई मिळेल, असे जाधव म्हणाले.





