Uddhav Thackeray Politics : उद्धव ठाकरे ॲक्शन मोडवर ! ‘या’ बड्या नेत्याची पदावरून हकालपट्टी
स्थानिक स्वराज्य संस्थांच्या निवडणुकीदरम्यान मोठ्या प्रमाणात पक्षांतर झाल्याने उद्धव ठाकरे गटाला (Uddhav Thackeray Politics) आधीच मोठा धक्का बसला होता. आता पुन्हा ठाकरे गटात एक महत्त्वाची उचलबांगडी झाली आहे.

Uddhav Thackeray Politics : गेल्या काही महिन्यांपासून महाराष्ट्राच्या राजकारणात सातत्याने घडामोडी घडत आहेत. स्थानिक स्वराज्य संस्थांच्या निवडणुकीदरम्यान मोठ्या प्रमाणात पक्षांतर झाल्याने उद्धव ठाकरे गटाला (Uddhav Thackeray Politics) आधीच मोठा धक्का बसला होता. आता पुन्हा ठाकरे गटात एक महत्त्वाची उचलबांगडी झाली आहे.
शिवसेना (उद्धव बाळासाहेब ठाकरे) पक्षाने परभणी जिल्हा प्रमुख गंगाप्रसाद आनेराव यांची तडकाफडकी पदावरून हकालपट्टी (Uddhav Thackeray Politics) करत नवा जिल्हा प्रमुख नियुक्त केला आहे. या निर्णयामुळे ठाकरे गटात खळबळ उडाली असून, परभणी जिल्ह्याच्या राजकारणात चर्चांना उधाण आले आहे.
‘या’ नेत्यावर सोपवली जबाबदारी
पक्षाने गंगाप्रसाद आनेराव यांच्याऐवजी विष्णू मुरकुटे यांची परभणी जिल्हा प्रमुखपदी नेमणूक केली आहे. या बदलामुळे खासदार संजय (बंडू) जाधव यांना मोठा धक्का बसल्याचे बोलले जात आहे. विष्णू मुरकुटे यांना केवळ जिल्हा प्रमुखपदच नव्हे तर परभणी आणि गंगाखेड या दोन महत्त्वाच्या विधानसभा मतदारसंघांची जबाबदारीही देण्यात आली आहे.
बैठकीला दांडी
या उचलबांगडीमागे २५ एप्रिल रोजी मुंबईतील शिवसेना भवन येथे झालेली बैठक (Uddhav Thackeray Politics) कारणीभूत ठरली आहे. उद्धव ठाकरे यांच्या उपस्थितीत परभणी लोकसभा मतदारसंघासंबंधी झालेल्या या बैठकीला खासदार संजय जाधव, गंगाप्रसाद आनेराव आणि त्यांचे काही समर्थक अनुपस्थित होते. यात उपजिल्हाप्रमुख आणि काही तालुकाप्रमुख देखील उपस्थित नव्हते. पक्षाने या अनुपस्थितीची गंभीर दखल घेतली आणि लगेचच गंगाप्रसाद आनेराव यांची जिल्हा प्रमुखपदावरून हकालपट्टी करण्याचा निर्णय घेतला.
खासदार संजय जाधव यांच्यावर दबाव?
मागील काही दिवसांपासून खासदार संजय जाधव शिंदे गटाकडे जाण्याच्या चर्चा जोरात होत होत्या. अशा स्थितीत उद्धव ठाकरे यांनी परभणी जिल्ह्यात संघटनात्मक बदल करून जाधव यांच्या प्रभावाला प्रत्युत्तर दिल्याचे मानले जात आहे. गंगाप्रसाद आनेराव हे जाधव यांचे निकटवर्तीय मानले जातात. त्यामुळे त्यांची हकालपट्टी ही जाधव यांच्या समर्थकांवरना पहिला मोठा धक्का असल्याचे परभणीतील राजकीय वर्तुळात बोलले जात आहे.






