Trump on osama bin laden। अमेरिकेचे अध्यक्ष डोनाल्ड ट्रम्प यांनी दहशहतवादी ओसामा बिन लादेनच्या आठवण काढली. त्यांनी,”इतिहास कधीही विसरणार नाही की अमेरिकन नेव्ही सीलने अल-कायदाचा नेता ओसामा बिन लादेनच्या लपण्याच्या ठिकाणी हल्ला केला आणि त्याच्या डोक्यात गोळी झाडली” असे म्हटले. तसेच ट्रम्प यांनी असेही पुनरुच्चार केले की, २००१ मध्ये अल-कायदाच्या दहशतवाद्यांनी वर्ल्ड ट्रेड सेंटरच्या ट्विन टॉवर्सवर हल्ला करण्याच्या एक वर्ष आधी त्यांनी बिन लादेनबद्दल इशारा दिला होता. ट्रम्प काय म्हणाले? Trump on osama bin laden। ट्रम्प यांनी यावेळी बोलताना,”इतिहास कधीही विसरणार नाही की नेव्ही सीलने ओसामा बिन लादेनच्या कंपाऊंडवर हल्ला केला आणि त्याच्या डोक्यात गोळी झाडली. ते लक्षात ठेवा,” असे म्हणाले. ट्रम्प यांनी व्हर्जिनियातील नॉरफोक येथे अमेरिकन नेव्हीच्या २५० व्या वर्धापन दिनानिमित्त आयोजित एका विशेष समारंभात सांगितले. ट्रम्प म्हणाले की, त्यांनी अधिकाऱ्यांना ९/११ च्या हल्ल्याच्या एक वर्ष आधी बिन लादेनवर लक्ष ठेवण्यास सांगितले होते. ते म्हणाले, “कृपया लक्षात ठेवा, मी वर्ल्ड ट्रेड सेंटरवरील हल्ल्याच्या एक वर्ष आधी ओसामा बिन लादेनबद्दल लिहिले होते. मी म्हणालो, ‘तुम्हाला ओसामा बिन लादेनवर लक्ष ठेवावे लागेल.’ मी एक वर्षापूर्वी म्हटले होते की मी ओसामा नावाचा एक माणूस पाहिला होता आणि मला तो आवडत नव्हता. मी म्हटले होते की त्याला देखरेखीखाली ठेवावे लागेल.” ट्रम्पचे दुःख बाहेर आले डोनाल्ड ट्रम्प म्हणाले, “त्यांनी त्याच्यावर लक्ष ठेवले नाही. एका वर्षानंतर, त्याने वर्ल्ड ट्रेड सेंटर उडवून दिले. म्हणून, मी काही श्रेय घेतले पाहिजे, कारण दुसरे कोणीही मला ते देणार नाही.” ट्रम्प म्हणाले की अमेरिकन नौदलाने “यूएसएस कार्ल विन्सनमधून बिन लादेनचा मृतदेह समुद्रात टाकला.” बिन लादेन पाकिस्तानमध्ये मारला गेला Trump on osama bin laden। मे २०११ मध्ये, अमेरिकन नेव्ही सीलने पाकिस्तानातील अबोटाबाद येथील एका घरात लपून बसलेल्या बिन लादेनला एका कारवाईत ठार मारले. ही कारवाई तत्कालीन अमेरिकेचे अध्यक्ष बराक ओबामा यांच्या कार्यकाळात झाली. माजी राष्ट्राध्यक्ष जो बायडेन यांच्या नेतृत्वाखाली अफगाणिस्तानातून अमेरिकेच्या माघारीवर टीका करणारे ट्रम्प असेही म्हणाले, “अमेरिका सहजपणे अफगाणिस्तान जिंकू शकली असती. आपण प्रत्येक युद्ध सहज जिंकू शकलो असतो.”