Police Bribe Case : पोलीस दलात खळबळ ! ‘या’ पोलीस अधिकाऱ्याला लाच घेताना अटक
परभणीत एका पोलीस हवालदाराला (Police Bribe Case) लाच घेताना लाचलुचपत प्रतिबंधक विभागाने (एसीबी) रंगेहाथ पकडले आहे. या घटनेमुळे पोलीस दलात मोठी खळबळ उडाली आहे.

Police Bribe Case : काही दिवसांपूर्वी नाशिकमध्ये जीएसटी अधिकाऱ्यांना लाखोंची लाच घेताना पकडण्यात आल्यानंतर आता परभणीत एका पोलीस हवालदाराला लाच घेताना लाचलुचपत प्रतिबंधक विभागाने (एसीबी) रंगेहाथ पकडले आहे. या घटनेमुळे पोलीस दलात मोठी खळबळ उडाली आहे.
मिळालेल्या माहितीनुसार, परभणी जिल्ह्यातील सोनपेठ पोलीस ठाण्यात कार्यरत असलेले पोलीस हवालदार भगवान मुंढे यांनी एका तक्रारदाराकडून लाच मागितली होती. गंगाखेड येथील ७० वर्षीय तक्रारदार (किंवा त्यांच्या कुटुंबातील व्यक्तीने) गोशाळेतील वादासंदर्भातील तक्रारीचा अर्ज सोनपेठ पोलीस ठाण्यात दाखल केला होता. या अर्जावर आवश्यक कारवाई करण्यासाठी किंवा आरोपीवर पावबंदी घालण्यासाठी हवालदार मुंढे यांनी सुरुवातीला १० हजार रुपयांची लाच मागितली. Police Bribe Case
तक्रारदाराने याबाबत पडताळणी केल्यानंतर तडजोडीअंती ८ हजार रुपये देण्याचे ठरले. तक्रारदाराने त्वरित लाचलुचपत प्रतिबंधक विभागाकडे (एसीबी) तक्रार दाखल केली. त्यानंतर एसीबीच्या पथकाने गंगाखेड-परळी रोडवरील निळा फाटा येथील विश्व लक्ष्मी रसवंती गृह या ठिकाणी सापळा रचला. Police Bribe Case

Jalgaon Bribe Case
नियोजित ठिकाणी हवालदार भगवान मुंढे यांनी पंचासमक्ष तक्रारदाराकडून ८ हजार रुपयांची लाच स्वीकारली. याचवेळी एसीबीच्या पथकाने त्यांना रंगेहाथ पकडले. कारवाईदरम्यान हवालदाराकडून मोबाईल, ओळखपत्र आणि जप्त केलेली रोख रक्कम असा पुरावा जप्त करण्यात आला.
ही संपूर्ण कारवाई लाचलुचपत प्रतिबंधक विभागाचे पोलीस उपअधीक्षक राहुल तरकसे यांच्या मार्गदर्शनाखाली पार पडली. सध्या या प्रकरणाचा पुढील तपास सुरू असून, दोषींवर कठोर कारवाई करण्याचे आश्वासन देण्यात आले आहे.





