Rahul Gandhi : लोकसभेतील विरोधी पक्षनेते राहुल गांधी यांनी नीट गोंधळावरून आणखी आक्रमक पवित्रा स्वीकारला. पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी तातडीने केंद्रीय शिक्षण मंत्री धर्मेंद्र प्रधान यांची हकालपट्टी करावी किंवा स्वत: जबाबदारी स्वीकारावी, अशी आग्रही मागणी त्यांनी केली. (Rahul Gandhi) पेपरफुटीनंतर नीट परीक्षा रद्द करण्यात आली. ती आता २१ जूनला घेतली जाणार आहे. त्या घडामोडी लाखों विद्यार्थ्यांची अस्वस्थता वाढवणाऱ्या ठरल्या. त्याचा पुन्हा संदर्भ देऊन राहुल यांनी सोशल मीडियावरून भूमिका मांडली. नीट परीक्षा देणाऱ्या २२ लाख विद्यार्थ्यांचा विश्वासघात करण्यात आला. (Rahul Gandhi) त्यावर मोदी एक शब्दही बोलण्यास तयार नाहीत. विद्यार्थ्यांनी केलेली मेहनत वाया गेली. नीट परीक्षेच्या दोन दिवस आधी व्हॉटस्ॲपवरून प्रश्नपत्रिका फुटल्याचे संपूर्ण देशाला ठाऊक आहे. त्याविषयी काही देणे-घेणे नसल्याचे प्रधान म्हणतात. (Rahul Gandhi) संसदीय समितीने काही शिफारसी केल्या होत्या. पण, त्यांना प्रधान यांनी केराची टोपली दाखवली. समितीमध्ये विरोधी पक्षांच्या सदस्यांचाही समावेश आहे. त्यामुळे समितीच्या शिफारसींचा काही उपयोग नाही, असे कारण त्यांनी दिले. देशाची संपूर्ण शिक्षण व्यवस्थाच उद्धवस्त झाली आहे, असे टीकास्त्र त्यांनी सोडले. (Rahul Gandhi)