Dharmendra Pradhan: “पुढील वर्षापासून नीट परीक्षा संगणक-आधारित अन् १५ मिनिटे जास्त वेळ…” ; शिक्षणमंत्र्यांची मोठी घोषणा
Shri Dharmendra Pradhan: नीट पेपरफुटी प्रकरणामुळे संपूर्ण देश हादरला असून विद्यार्थ्यांमध्ये संताप स्पष्टपणे दिसून येत आहे. या गदारोळाच्या पार्श्वभूमीवर, केंद्रीय शिक्षण मंत्री धर्मेंद्र प्रधान आज पहिल्यांदाच माध्यमांसमोर आले.

Shri Dharmendra Pradhan: नीट (NEET) पेपरफुटी प्रकरणामुळे संपूर्ण देश हादरला असून विद्यार्थ्यांमध्ये संताप स्पष्टपणे दिसून येत आहे. या गदारोळाच्या पार्श्वभूमीवर, केंद्रीय शिक्षण मंत्री धर्मेंद्र प्रधान आज पहिल्यांदाच माध्यमांसमोर आले. त्यांनी पत्रकार परिषदेत या सर्व प्रकरणावर भाष्य केले.
धर्मेंद्र प्रधान पत्रकार परिषदेत बोलताना, “गुन्हेगाराला पातळातूनही शोधून काढलं जाईल.” असे आश्वासन त्यांनी दिले. दरम्यान, या पत्रकार परिषदेच्या अगोदर एनटीएने नीट परीक्षेविषयी नवीन तारखा जाहीर केल्या होत्या. नीटची पुनर्परीक्षा (NEET-UG re-examination) आता २१ जून रोजी घेण्यात येणार आहे. तसेच प्रवेशपत्रे आणि परीक्षा केंद्रांविषयीची माहिती एनटीएकडून दिली जाणार आहे.
३ ते ४ दिवसांनंतर निर्णय घेतला (Dharmendra Pradhan)
केंद्रीय शिक्षण मंत्री धर्मेंद्र प्रधान यांनी माध्यमांशी बोलताना,”पेपर फुटल्यानंतर तीन ते चार दिवसांनी परीक्षा रद्द करण्यात आली, जेणेकरून कोणत्याही विद्यार्थ्याला गैरसोय होऊ नये.” असे सांगितले.
पुढे ते म्हणाले, “आम्ही आज एक नवीन तारीख जाहीर केली आहे. आतापासून एका महिन्यानंतर नवीन परीक्षा घेतली जाईल. आमचा दृष्टिकोन तोच राहील. आम्ही परीक्षा माफियाशी लढत आहोत.” विविध सोशल मीडिया हँडलवर दिशाभूल करण्याच्या उद्देशाने चुकीची माहिती पसरवली जात आहे, जे टाळणे अत्यंत महत्त्वाचे आहे. परिणामी, सरकारने तात्काळ तपास सीबीआयकडे सोपवला. यावेळी सीबीआय तपास करून अनियमितता उघडकीस आणेल असे म्हणाले.
पुढे मंत्र्यांनी, “तपास यंत्रणा हे प्रकरण गांभीर्याने घेत आहेत. कोणत्याही दहशतवादी प्रचाराने आगामी परीक्षांदरम्यान असे करणे टाळावे, अन्यथा शिक्षेला सामोरे जावे लागेल” असे त्यांनी म्हटले.
अफवांपासून सावध राहण्याचा इशारा
सध्याच्या डिजिटल युगात अफवा आणि चुकीची माहिती हे एक मोठे आव्हान म्हणून समोर आले आहे. पालक आणि विद्यार्थ्यांना सोशल मीडियावर पसरवल्या जाणाऱ्या खोट्या आणि दिशाभूल करणाऱ्या दाव्यांपासून दूर राहण्याचे आवाहन करण्यात येत आहे. केवळ सरकार किंवा एनटीएने (NTA) जारी केलेल्या निवेदनांवरच लक्ष केंद्रित करा. यावेळी प्रशासन तांत्रिक आव्हानांना सामोरे जाण्यासाठीही सज्ज आहे. (Shri Dharmendra Pradhan)
#WATCH दिल्ली: केंद्रीय शिक्षा मंत्री धर्मेंद्र प्रधान ने कहा, “अभी NTA ने NEET-UG की नई परीक्षा की तिथि की घोषणा की है। 21 जून को पुनर्परीक्षा की तारीख की घोषणा की है…छात्रों का भविष्य, उनके परिश्रम के प्रति संवेदनशीलता हमारी प्राथमिकता है। 3 मई को परीक्षा हुई थी और 7 मई को… pic.twitter.com/tC9cfRtBxc
— ANI_HindiNews (@AHindinews) May 15, 2026
नवीन तारीख जाहीर (Dharmendra Pradhan)
आम्ही नीट (NEET) परीक्षेची नवीन तारीख वेळेवर जाहीर केली आहे. पेपरफुटीचे वृत्त समोर आल्यापासून आम्ही या प्रकरणावर बारकाईने लक्ष ठेवून होतो. तपासाची जबाबदारी सीबीआयकडे सोपवण्यात आली होती.
धर्मेंद्र प्रधान म्हणाले, “या घटनेमुळे आम्हाला खूप दुःख झाले आहे, परंतु एका व्यापक उद्दिष्टाच्या दृष्टीने, अन्याय टाळण्यासाठी आम्हाला हा निर्णय घ्यावा लागला. आम्हाला अनेक सूचना मिळाल्या आहेत. एनटीए (NTA) मध्ये शून्य चुका होतील याची खात्री करणे ही आमची जबाबदारी आहे आणि आम्ही ते करत राहू. एनटीए दरवर्षी १ कोटी विद्यार्थ्यांसाठी परीक्षा आयोजित करते. विद्यार्थ्यांवर कोणताही आर्थिक भार पडणार नाही याची खात्री करण्याची जबाबदारी आम्ही घेतो. एनटीएने विद्यार्थ्यांना त्यांच्या पसंतीच्या शहरात परीक्षा देण्यासाठी एका आठवड्याची संधी देण्याचा निर्णय घेतला आहे.”
त्यांनी पुढे सांगितले की, “तपासादरम्यान १२ मे पर्यंत हे स्पष्ट झाले की, अंदाजपत्रकाच्या नावाखाली मूळ प्रश्नपत्रिकेतील प्रश्न फुटले होते. ते म्हणाले की, शिक्षण माफियामुळे कोणताही प्रामाणिक आणि मेहनती विद्यार्थी आपल्या हक्कांपासून वंचित राहावा, अशी सरकारची इच्छा नाही.”
पुढील वर्षापासून परीक्षा ऑनलाइन होणार ( Dharmendra Pradhan)
शिक्षणमंत्री धर्मेंद्र प्रधान यांनी, “विद्यार्थ्यांसाठी नीट (NEET) परीक्षा पुढील वर्षापासून संगणक-आधारित असेल. आतापर्यंत परीक्षा OMR शीटवर घेतली जात होती, ज्यामुळे पेपरफुटीचा धोका वाढला होता. याव्यतिरिक्त, परीक्षेची वेळ १५ मिनिटांनी वाढवली जाईल, म्हणजेच विद्यार्थ्यांना आता पेपर लिहिण्यासाठी १५ मिनिटे अधिक मिळतील.” अशी मोठी घोषणा केली आहे.
प्रवेशपत्रे १४ जून रोजी जारी होणार
केंद्रीय शिक्षण मंत्री धर्मेंद्र प्रधान (Dharmendra Pradhan) यांनी घोषणा केली आहे की, “नीट यूजी २०२६ पुनर्परीक्षेची प्रवेशपत्रे १४ जूनपर्यंत जारी केली जातील. विद्यार्थ्यांना अतिरिक्त १५ मिनिटे देखील दिली जातील”.





