Rahul Gandhi : पश्चिम आशियातील युद्धाला तोंड फुटण्याआधी पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी इस्त्रायलचा दौरा केला. तो दौरा अमेरिकेचे अध्यक्ष डोनाल्ड ट्रम्प यांच्या सूचनेवरून झाला, असा आरोपवजा दावा कॉंग्रेस नेते राहुल गांधी (Rahul Gandhi) यांनी केला. विधानसभा निवडणुकीला सामोऱ्या जाणाऱ्या तमिळनाडूतील प्रचार धुमाळीत राहुल सहभागी झाले आहेत. ते प्रचारात प्रामुख्याने मोदींवर निशाणा साधत आहेत. ट्रम्प यांचे मोदींवर नियंत्रण असल्याची टीका त्यांनी याआधी केली होती. तोच धागा सोमवारी राहुल (Rahul Gandhi) यांनी तमिळनाडूतील एका प्रचार सभेत पकडला. ट्रम्प सांगतील ते मोदी करतील. त्यासाठी अमेरिकेत दाखल अदानी प्रकरण, एपस्टीन फाईल्स कारणीभूत आहेत. ट्रम्प यांनी स्वत:च याआधी मोदी त्यांना सर म्हणत असल्याचे जाहीर भाष्य केले, याकडे राहुल यांनी लक्ष वेधले. पुढे बोलताना ते म्हणाले, तमिळनाडूतील मुख्यमंत्र्यांनी आपल्याला सर म्हणावे अशी मोदींची इच्छा आहे. विद्यमान मुख्यमंत्री एम.के.स्टॅलिन कधीच तसा उल्लेख करणार नाहीत. Rahul Gandhi त्यामुळे मोदींना अण्णाद्रमुकचा मुख्यमंत्री हवाय. तमिळनाडूतील सरकारवर पूर्ण नियंत्रण हवयं. मात्र, भाजप आणि मोदींनी काहीही स्वप्न पाहिले तरी ते कधीच तमिळनाडूवर नियंत्रण मिळवू शकणार नाहीत, अशी पुस्ती जोडत राहुल (Rahul Gandhi) यांनी तमिळनाडूत भाजप आणि मित्रपक्षांना सत्ता मिळणार नसल्याचा विश्वास व्यक्त केला.