Anvay Dravid Selection : ‘द वॉल’चा वारसदार मैदान गाजवण्यासाठी सज्ज! राहुल द्रविडचा लहान मुलगा अन्वयची भारतीय संघात निवड
Anvay Dravid Selection : भारताचे माजी कर्णधार आणि महान फलंदाज राहुल द्रविड यांचा लहान मुलगा अन्वय द्रविड याची पहिल्यांदाच भारतीय संघात निवड करण्यात आली आहे.

Rahul Dravid Son Anvay Dravid Selected India Under 19 Squad : भारतीय क्रिकेट वर्तुळातून एक अतिशय मोठी आणि आनंदाची बातमी समोर येत आहे. बीसीसीआयच्या ज्युनिअर निवड समितीने आगामी श्रीलंका दौऱ्यासाठी भारताच्या अंडर-१९ संघाची घोषणा केली आहे. या संघ निवडीतील सर्वात महत्त्वाची आणि वेधून घेणारी गोष्ट म्हणजे, भारताचे माजी कर्णधार आणि महान फलंदाज राहुल द्रविड यांचा लहान मुलगा अन्वय द्रविड याची पहिल्यांदाच भारतीय संघात निवड करण्यात आली आहे. अवघ्या १७ वर्षांचा अन्वय आता आपल्या वडिलांप्रमाणेच निळ्या जर्सीत देशाचे प्रतिनिधित्व करताना दिसणार आहे. (Anvay Dravid Selection)
यष्टीरक्षक-फलंदाज म्हणून मिळाली संधी – (Anvay Dravid Selection)
भारतीय संघाचा हा श्रीलंका दौरा ४ जुलै २०२६ पासून हंबनटोटा येथे सुरू होत आहे. या दौऱ्यात भारतीय संघ ३ एकदिवसीय सामने आणि २ मल्टी-डे (चार दिवसीय) सामने खेळणार आहे. अन्वय द्रविडला १५ सदस्यीय एकदिवसीय संघात यष्टीरक्षक-फलंदाज म्हणून स्थान मिळाले आहे. अन्वयने देशांतर्गत क्रिकेटमधील वयोगटांच्या स्पर्धांमध्ये सातत्याने उत्कृष्ट कामगिरी करून निवडकर्त्यांचे लक्ष वेधले होते.
देशांतर्गत क्रिकेटमध्ये दमदार रेकॉर्ड – (Anvay Dravid Selection)
कर्नाटक अंडर-१९ संघाचे नेतृत्व करताना त्याने विनू मांकड ट्रॉफीमध्ये आपल्या संघाला क्वार्टर फायनलपर्यंत पोहोचवले होते. या स्पर्धेत मधल्या फळीत फलंदाजी करताना त्याने ६ डावात २२० धावा केल्या, ज्यात हिमाचल प्रदेशविरुद्धच्या कठीण धावसंख्येचा पाठलाग करताना त्याने ठोकलेली नाबाद ८२ धावांची मॅचविनिंग खेळी समाविष्ट होती. यापूर्वी त्याने अंडर-१६ विजय मर्चंट ट्रॉफीमध्येही शानदार शतक झळकावले होते. या दौऱ्यासाठी मध्य प्रदेशच्या यशवर्धन सिंह चौहान याच्याकडे भारतीय संघाचे कर्णधारपद सोपवण्यात आले आहे, तर लक्ष्य रायचंदानी याला उपकर्णधार बनवण्यात आले आहे.
🚨 News 🚨
India Men’s U19 squads for Sri Lanka series announced.
More Details 🔽https://t.co/tGJ7FRywxK
— BCCI (@BCCI) June 11, 2026
श्रीलंका दौऱ्यासाठी भारताचा अंडर-१९ संघ : (Anvay Dravid Selection)
Another Dravid on the India pathway 👏
Anvay Dravid, Rahul Dravid’s younger son, has received his maiden India U19 call-up and has been named in the One-Day squad for the Sri Lanka tour
His elder brother Samit was also selected for India U19 in 2024, but missed out due to… pic.twitter.com/vucbnwR4ym
— Cricbuzz (@cricbuzz) June 11, 2026
भारतीय अंडर-१९ एकदिवसीय संघ: सागर विर्क, लक्ष्य रायचंदानी (उपकर्णधार), यशवर्धन सिंग चौहान (कर्णधार), विनीत व्हीके, अर्जुन राजपूत, कुशाग्र ओझा, रजत बघेल (यष्टीरक्षक), अन्वय द्रविड (यष्टीरक्षक), अनमोलजीत सिंह, यमोलजीत सिंह, गोविंद रोविड, विनीत व्ही.के. व्ही., काव्या परेश पटेल, मोहित उलवा, इशान सूद.
भारतीय अंडर १९ मल्टी-डे संघ: सागर विर्क, लक्ष्य रायचंदानी (उप-कर्णधार), यशवर्धन सिंग चौहान (कर्णधार), पटेल कुश, मनाल चौहान, कुशाग्र ओझा, मानव कृष्णा (यष्टीरक्षक), आर्यन संदेश सकपाळ (यष्टीरक्षक), हेमचुदेसन जे, रोहित पटेल, रोहित पटेल, यवमान जे. प्रियांशु सिंग, प्रणव राघवेंद्र, चिगुरुपती व्यंकट
श्रीलंका टूर वेळापत्रक –
- ४ जुलै २०२६: पहिला वनडे, हंबनटोटा
- ६ जुलै २०२६: दुसरी वनडे, हंबनटोटा
- ९ जुलै २०२६: तिसरा एकदिवसीय, हंबनटोटा
- १३ जुलै २०२६- १६जुलै २०२६: पहिला बहु-दिवसीय सामना, गॅले
- २० जुलै २०२६- जुलै २३, २०२६: दुसरा बहुदिवसीय सामना, कोलंबो





