ICC Test Rankings मध्ये मोठा तख्तापालट! जो रूटचे बादशहापद हिरावले, हॅरी ब्रूकने केलं चेकमेट; गिलची मोठी झेप
ICC Test Rankings : १० जून रोजी कसोटी खेळाडूंची ताजी क्रमवारी (रँकिंग) जाहीर केली असून, यामध्ये मोठा तख्तापलट झाला आहे.

ICC Test Rankings Harry Brook Reclaims No 1 Spot : आयसीसीने बुधवार, १० जून रोजी कसोटी खेळाडूंची ताजी क्रमवारी (रँकिंग) जाहीर केली असून, यामध्ये मोठा तख्तापलट झाला आहे. इंग्लंडचा दिग्गज फलंदाज जो रूट याच्याकडून जगातील नंबर-१ फलंदाजाचा मुकुट हिरावला गेला आहे. रूटच्याच देशाचा युवा फलंदाज हॅरी ब्रूक ८६९ रेटिंग गुणांसह पुन्हा एकदा जगातील अव्वल कसोटी फलंदाज बनला आहे. तर न्यूझीलंडविरुद्धच्या पहिल्या कसोटीत फ्लॉप ठरलेला जो रूट ८५३ गुणांसह थेट तिसऱ्या स्थानावर घसरला आहे. ऑस्ट्रेलियाचा ट्रॅव्हिस हेड (८५३ गुण) दुसऱ्या स्थानावर पोहोचला आहे.
कॅप्टन शुबमन गिलची टॉप-१० मध्ये ‘मौज’ –
अफगाणिस्तानविरुद्धच्या मुल्लानपूर कसोटीत ऐतिहासिक विजय मिळवणाऱ्या भारतीय संघालाही या रँकिंगमध्ये मोठा फायदा झाला आहे. टीम इंडियाचा कर्णधार शुबमन गिलने दोन स्थानांची झेप घेत थेट ८ वे स्थान पटकावले आहे. गिलने अफगाणिस्तानविरुद्ध १२६ धावांची शानदार शतकी खेळी केली होती. याशिवाय, ८१ धावांची खेळी करणाऱ्या ऋषभ पंतला एका स्थानाचा फायदा झाला असून तो १२ व्या क्रमांकावर पोहोचला आहे. मात्र, सलामीवीर यशस्वी जैस्वाल एका स्थानाने घसरून ९ व्या क्रमांकावर आला आहे.
गस अॅटकिन्सनची मोठी झेप; बुमराह-जडेजा अव्वल स्थानी कायम!
Back to the 🔝
Harry Brook ascends to the top of the ICC Men’s Test Batting Rankings ⛰️
More 👉 https://t.co/23sRBOXo2L pic.twitter.com/p4rhTOQfuk
— ICC (@ICC) June 10, 2026
कसोटी गोलंदाजांच्या यादीत इंग्लंडच्या गस अॅटकिन्सनने ७ स्थानांची मोठी झेप घेत टॉप-१० मध्ये (१० व्या क्रमांकावर) एन्ट्री केली आहे. ऑलराउंडर्सच्या यादीतही तो ६ व्या स्थानावर पोहोचला आहे. न्यूझीलंडचा काईल जेमिसन (२२ वे) आणि ओली रॉबिन्सन (२३ वे) यांनी रँकिंगमध्ये पुन्हा पुनरागमन केले आहे.
विशेष म्हणजे, अफगाणिस्तानविरुद्धच्या कसोटीत विश्रांती देण्यात आलेला भारताचा स्टार वेगवान गोलंदाज जसप्रीत बुमराह ८७० गुणांसह जगातील नंबर-१ कसोटी गोलंदाज म्हणून कायम आहे. ऑस्ट्रेलियाचा मिचेल स्टार्क दुसऱ्या स्थानावर आहे. तसेच, ऑलराउंडर्सच्या यादीत भारताचा रवींद्र जडेजा (४४६ गुण) नंबर-१ च्या सिंहासनावर ठाम आहे.





