पुरुषोत्तम करंडक भारती विद्यापीठाच्या कॉलेज ऑफ फाइन आर्टस्च्या ‘लाजाळू’ एकांकिकेला
महाराष्ट्रीय कलोपासक आयोजित आंतर महाविद्यालयीन पुरुषोत्तम करंडक एकांकिका स्पर्धेत भारती विद्यापीठाचे कॉलेज ऑफ फाइन आर्टस्ने सादर केलेल्या ’लाजाळू’ एकांकिकेने बाजी…

जयराम हर्डीकर करंडक एरर : ह्युमन डिटेक्टेड या एकांकिकेला
पुणे : महाराष्ट्रीय कलोपासक आयोजित आंतर महाविद्यालयीन पुरुषोत्तम करंडक एकांकिका स्पर्धेत भारती विद्यापीठाचे कॉलेज ऑफ फाइन आर्टस्ने सादर केलेल्या ’लाजाळू’ एकांकिकेने बाजी मारत ६१व्या पुरुषोत्तम करंडकावर आपले नाव कोरले. संघाला ५००१ रुपयांचे रोख पारितोषिक देण्यात येणार आहे. सर्वोकृष्ट प्रायोगिक एकांकिकेसाठी असलेलां जयराम हर्डीकर करंडक महर्षी कर्वे स्त्री शिक्षण संस्थेचे कमिन्स अभियांत्रिक महाविद्यालय यांनी सादर केलेल्या एरर : ह्युमन डिटेक्टेड या एकांकिकेने पटकाविला.
स्पर्धेतील सांघिक द्वितीय क्रमांकाचे पारितोषिक हरी विनायक करंडक “आठवडे बाजार” (अण्णासाहेब मगर महाविद्यालय) या एकांकिकेला तर सांघिक तृतीय संजीव करंडक “स्कीम” (मराठवाडा मित्र मंडळाचे शंकरराव चव्हाण विधी महाविद्यालय) या एकांकिकेला जाहीर करण्यात आला.
पुरुषोत्तम करंडक एकांकिका स्पर्धेची अंतिम फेरी शनिवार (दि. ५) आणि रविवारी (दि. ६) भरत नाट्य मंदिरात आयोजित करण्यात आली होती. प्राथमिक फेरीतून अंतिम फेरीत पोहोचलेल्या नऊ संघाचे तीन सत्रात सादरीकरण झाले. स्पर्धेचा निकाल रविवारी (दि. ६) रात्री जाहीर करण्यात आला. स्पर्धेचे यंदाचे ६१वे वर्ष आहे.
हृषीकेश जोशी, रेणुका दफ्तरदार, निपुण धर्माधिकारी यांनी स्पर्धेचे परीक्षण केले.
: स्पर्धेचा सविस्तर निकाल :
सांघिक प्रथम : लाजाळू (भारती विद्यापीठाचे कॉलेज ऑफ फाइन आर्टस्)
सांघिक द्वितीय : आठवडे बाजार (अण्णा साहेब मगर महाविद्यालय, हडपसर)
सांघिक तृतीय : स्कीम (मराठवाडा मित्र मंडळाचे शंकरराव चव्हाण विधी महाविद्यालय)
सर्वोत्कृष्ट प्रायोगिक एकांकिका : एरर : ह्युमन डिटेक्टेड (महर्षी कर्वे स्त्री शिक्षण संस्थेचे कमिन्य अभियांत्रिकी महाविद्यालय)
सर्वोत्कृष्ट विद्यार्थी लेखक : आदित्य माने (इन द नेम ऑफ ह्युमॅनिटी, डीवाय पाटील अभियांत्रिकी महाविद्यालय, आकुर्डी)
सर्वोत्कृष्ट विद्यार्थी प्रायोगिक लेखक : नीरज जोशी (चिंता करितो विश्वार्ची, डीइएस पुणे युनिव्हर्सिटी)
सर्वोत्कृष्ट दिग्दर्शक : स्वानंदी भारताल (लाजाळू, भारती विद्यापीठाचे कॉलेज ऑफ फाइन आर्टस्)
उत्तेजनार्थ दिग्दर्शन : (अंतिम फेरी) : संस्कार फडके (आठवडे बाजार, अण्णासाहेब मगर महाविद्यालय, हडपसर)
उत्तेजनार्थ दिग्दर्शन : (अंतिम फेरी) : आर्या दीक्षित, अदिती कुलकर्णी (एरर : ह्युमन डिटेक्टेड, महर्षि कर्वे स्त्री शिक्षण संस्थेचे कमिन्स कॉलेज)
सर्वोत्कृष्ट वैयक्तिक अभिनय नैपुण्य : स्वानंदी भारताल (लाजाळू, शुभ्रा, भारती विद्यापीठाचे कॉलेज ऑफ फाइन आर्टस्)
अभिनय नैपुण्य (अभिनेता) : शिवकुमार घोडेस्वार (लाजाळू, अमुश्या, भारती विद्यापीठाचे कॉलेज ऑफ फाइन आर्टस्)
अभिनय नैपुण्य (अभिनेत्री) : सुप्रिया यादव (मुक्ताक्षरे, मुक्ता, राजर्षी शाहू अभियांत्रिकी महाविद्यालय)
वाचिक अभिनय नैपुण्य : पार्थ ढोरे (इन द नेम ऑफ ह्युमॅनिटी, डी.वाय.पाटील अभियांत्रिकी महाविद्यालय, आकुर्डी)
अभिनय उत्तेजनार्थ (अंतिम फेरी) : विद्यार्थी, भूमिका, एकांकिका महाविद्यालय या क्रमाने
केतकी भालवणकर (मुक्ता, नातीगोती, मॉडर्न महाविद्यालय गणेशखिंड)
विराज दिघे (बाप, नातीगोती, मॉडर्न महाविद्यालय गणेशखिंड)
आदित्य माने (कालेब, इन द नेम ऑफ ह्युमॅनिटी, डीवाय पाटील अभियांत्रिकी महाविद्यालय, आकुर्डी)
मुक्ता बापट (शमीम बानो, ईमान, सर परशुराम भाऊ महाविद्यालय)
शाश्वती वझे (फातीमा, ईमान, सर परशुराम भाऊ महाविद्यालय)
मैत्रेयी दीक्षित (आस्मा, ईमान, सर परशुराम भाऊ महाविद्यालय)
ओंकार कापसे (प्रताप, आठवडे बाजार, अण्णासाहेब मगर महाविद्यालय, हडपसर)
आर्या थोरात (तारा, मुक्ताक्षरे, राजर्षी शाहू अभियांत्रिकी महाविद्यालय)
तनिष्का देशमुख (कमल (आई), स्कीम, मराठवाडा मित्र मंडळाचे शंकरराव चव्हाण विधी महाविद्यालय)
दिशा उपाध्ये (सुली (शेजारिण), स्कीम, मराठवाडा मित्र मंडळाचे शंकरराव चव्हाण विधी महाविद्यालय)
सर्वोत्कृष्ट आयोजित संघ : चिंता करितो विश्र्वाची (डीइएस पुणे युनिव्हर्सिटी)
सर्वोत्कृष्ट आयोजित संघ (भगीरथ करंडक) – चिंता करितो विश्वाची (डी.ई.एस.पुणे युनिव्हर्सिटी)





