Pune Ganesh Utsav Festival 2025 : अवघे काही दिवस गणरायाच्या आगमनाला राहिले आहेत. यामुळे सार्वजिक गणेशउत्सव मंडळाची लगभग पाहायला मिळत आहे. पुणे शहरात आणि जिल्ह्यात गणपती उत्सव मोठ्या जल्लोषात साजरा केला जातो. पुणे शहरातील मानाच्या पाच गणपतींची विसर्जन मिरवणूक निघाल्यानंतर इतर सार्वजनिक मंडळे मार्गस्थ होतात. यामुळे विसर्जन मिरवणुका वेळेत पूर्व होत नाहीत. या पार्श्वभूमीवर लक्ष्मी रस्त्यासह सर्व मार्गावरील गणपती विसर्जन मिरवणूक सकाळी सात वाजता सुरू करण्यात यावी, अशी आग्रही मागणी गणपती मंडळांनी केली आहे. मंडळांनी केलेल्या मागण्यामुळे प्रशासनासमोर नवा पेच निर्माण झाला आहे. या पार्श्वभूमीवर पोलिस प्रशासन काय भूमिका घेणार याकडे लक्ष लागलेले आहे. गेल्या अनेक वर्षांपासून पुण्याची सार्वजनिक गणेशोत्सव मिरवणूक तब्बल २९ ते ३० तास लांबत चालली आहे. हे तास कमी करणे आवश्यक असल्याने सर्व मंडळांनी वेळेत बदल करण्याची आग्रही मागणी देखील केली आहे. पोलिसांनाकडे कोणती मागणी केली? आज या पार्श्वभूमीवर मंडळासोबत पोलिसांची बैठक पार पडली. यावेळी मानाच्या पाच गणपतींची मिरवणूक दुपारी १२ पर्यंत पूर्ण मार्गस्थ करावी असे सांगण्यात आले. एक मंडळ एक ढोल पथक करा, अशी विनंती देखील गणेश मंडळांनी पोलिसांना विनंती केली आहे. तसेच मानाच्या गणपतींची मिरवणूक सुरू होण्यापूर्वी इतर रस्त्यांवरून मार्गस्थ होण्यासाठी मंडळांना मिरवणुकीची परवानगी द्या, बेलबाग चौक ते नाना पेठ रस्ता गणेशोत्सव दरम्यान रस्ता सुरू करावा, अशी मागणी पोलिसांकडे करण्यात आली आहे. हेही वाचा : Umesh Patil : राष्ट्रवादीच्या जिल्हाध्यक्षाचा ‘कार’नामा समोर; आमदार नसूनही गाडीवर लावला लोगो, कायद्याचा भंग?