Pune : पार्किंगमधील ४ ते ५ कारच्या काचा फोडणारा तरुण अटकेत
Pune: १९ वर्षीय तरुणाला सिंहगड रोड पोलिसांनी अवघ्या काही तासांत अटक केली

पुणे : सिंहगड रोड परिसरातील विश्रांती नगर येथील सुयोग सोसायटीच्या पार्किंगमध्ये उभ्या असलेल्या चार ते पाच चारचाकी वाहनांच्या मागील काचा फोडून नुकसान करणाऱ्या १९ वर्षीय तरुणाला सिंहगड रोड पोलिसांनी अवघ्या काही तासांत अटक केली.
मिळालेल्या माहितीनुसार, मंगळवारी (११ ऑगस्ट) पहाटे सुमारे २ वाजण्याच्या सुमारास मिलिंद कृष्णाजी पुणेकर (वय ४७, रा. सुयोग सोसायटी, विश्रांती नगर, हिंगणे खुर्द) यांनी आपत्कालीन ११२ क्रमांकावर फोन करून सोसायटीच्या पार्किंगमधील चार ते पाच वाहनांच्या मागील काचा फोडल्याची माहिती दिली.
घटनेची माहिती मिळताच रात्रगस्त अधिकारी व मार्शल पथकाने परिसरात शोधमोहीम राबवून संशयित शंतनू सुरेश मेंद (वय १९, सध्या रा. विश्रांती नगर, हिंगणे खुर्द, सिंहगड रोड) याला ताब्यात घेतले.
या प्रकरणी सिंहगड रोड पोलीस ठाण्यात गुन्हा क्रमांक २८९/२०२६ दाखल करण्यात आला असून, भारतीय हत्यार कायदा कलम ४/२५ तसेच बीएनएस कलम ३२४(४) अन्वये गुन्हा नोंदविण्यात आला आहे. पोलिसांनी आरोपीला अटक केली असून त्याच्याविरुद्ध यापूर्वी कोणताही गुन्हा दाखल नसल्याची माहिती पोलिसांनी दिली.
हेही वाचा:





