Pune : रसिकांच्या प्रतिसादात रंगला “प्रेमरंग”
Pune : बदाम, सेल्फी, चिमणी, ध्रुवपद अशा अनेक कवितांना रसिकांनी प्रेम रंग या कार्यक्रमात उत्स्फूर्त प्रतिसाद दिला. प्रेमाच्या विविध छटा दाखवणारी ही शब्दसुरांची मैफिल पत्रकार भवन मधील हॉलमध्ये आयोजित करण्यात आली होती.

प्रेमरंग या कार्यक्रमात कवी मिलिंद गाडगीळ यांनी प्रेम भावनेच्या विविध छटा कवितांमधून मांडल्या. आनंद, दुःख, विरह ,व्याकुळता, विरक्ती, भक्ती अशा सारख्या असंख्य छटा गाडगीळ यांनी यावेळी कवितेच्या माध्यमातून सादर केल्या.
प्रेमरंग या कार्यक्रमास संगीत साथ सुभाष देशपांडे आणि सुर साथ मधुमिता देवधर रसाळ यांनी केली. कवितेला अनुसरून काही विनोदी किस्सेही यावेळी मिलिंद गाडगीळ यांनी सांगितले त्यालाही रसिकांनी उत्तम प्रतिसाद दिला.