pune : नऊ वर्षीय मुलीच्या रक्ताची फेरतपासणी
pune :

डेंग्यूबाधित मृत्यू प्रकरणी रुबी क्लिनिकला निर्देश
pune : डेंग्यूबाधित नऊ वर्षीय मुलीच्या आजाराची माहिती महापालिकेला वेळेत न कळवल्याप्रकरणी आरोग्य विभागाने रुबी हॉल क्लिनिकला नोटीस बजावून तात्काळ खुलासा मागवला आहे. त्या मुलीच्या रुग्णाचे रक्ताचे नमुने फेरतपासणीसाठी एनआयव्हीकडे सोपविण्याचे आदेश दिले आहेत.
आरोग्य अधिकारी डॉ. नीना बोराडे आणि सहाय्यक आरोग्य अधिकारी डॉ. राजेश दिघे यांनी यासंदर्भात पत्र जारी केले आहे. रुग्णालयाकडून येणारी माहिती अचूक आणि वेळेत असणे आवश्यक असल्याचे प्रशासनाने स्पष्ट केले आहे.
या प्रकरणातील विलंब गांभीर्याने घेण्यात आला असून, रुग्णालयाच्या उत्तरावर पुढील कार्यवाही अवलंबून असेल. आरोग्य विभागाने नऊ वर्षीय मुलीची डेंग्यू चाचणी कोणत्या प्रकारे केली, याचा सविस्तर प्रयोगशाळा अहवाल सादर करण्यास सांगितले असून, रक्ताचे नमुने कोल्ड चेनमध्ये महापालिकेच्या सेवकाकडे तात्काळ स्वाधीन करण्याचे निर्देश दिले आहेत.





