Shree Mahalakshmi Temple: कोजागरी पौर्णिमेनिमित्त अन्नकोट
Shree Mahalakshmi Temple:

श्री महालक्ष्मी मंदिरातर्फे भजन संध्या आणि महाआरती
Shree Mahalakshmi Temple: कोजागरी पौर्णिमेनिमित्त अन्नकोट श्री महालक्ष्मी मंदिर, सारसबागतर्फे कोजागरी पौर्णिमेनिमित्त रविवारी मंदिरात अन्नकोट साकारण्यात आला. या वेळी श्री महालक्ष्मी, श्री महासरस्वती आणि श्री महाकाली देवीला ५६ भोगाचा अन्नकोट दाखविण्यात आला.
मंदिरात भजन संध्या आणि महाआरतीचे आयोजन करण्यात आले. ट्रस्टचे प्रमुख संस्थापक आणि विश्वस्त राजकुमार अग्रवाल, प्रमुख विश्वस्त अमिता अग्रवाल, विश्वस्त ॲड. प्रताप परदेशी, विश्वस्त आणि उत्सव प्रमुख डॉ. तृप्ती अग्रवाल, विश्वस्त भरत अग्रवाल, प्रवीण चोरबेले, हेमंत अर्नाळकर, नारायण काबरा, राजेश सांकला, रमेश पटोदिया, राजकुमार चमडीया, नीलेश लद्दड आदी पदाधिकारी आणि कार्यकर्ते उपस्थित होते.
प्रमुख विश्वस्त अमिता अग्रवाल म्हणाल्या, विविध प्रकारच्या मिठाई, नमकीन यांसह ५६ प्रकारचे पदार्थ या अन्नकोटामध्ये मांडून नैवेद्य तिन्ही देवींना दाखवण्यात आला. याशिवाय मंदिरात दुपारी हवन, तसेच सायंकाळी भजनाचा कार्यक्रम आयोजित करण्यात आला होता.
यामध्ये महिला भक्तांनी मोठ्या संख्येने सहभाग घेतला. कोजागरी पौर्णिमेनिमित्त मंदिरास आकर्षक सजावट करण्यात आली. सर्व भक्तांना प्रसाद आणि दूध देण्यात आले.





