Rana Suryavanshi: राणा सूर्यवंशी रुग्णालयातून गायब
Rana Suryavanshi:

पोलिसांच्या चौकशीपूर्वीच घेतला डिस्चार्ज?
Rana Suryavanshi: स्वतःवर हल्ला झाल्याचा बनाव केल्याचा संशय असलेल्या राणा सूर्यवंशी यांच्याबाबत नाट्यमय घडामोडी समोर येत आहेत. पुण्यातील रुबी हॉल क्लिनिकमध्ये त्यांच्यावर उपचार सुरू होते.
या प्रकरणाचा पुढील तपास करण्यासाठी पोलीस रुग्णालयात पोहोचण्यापूर्वीच ते तिथून निघून गेल्याची माहिती समोर आली आहे. त्यामुळे सूर्यवंशी रुग्णालयातून नेमके कुठे गेले, याबाबत प्रश्न उपस्थित झाले आहेत.
राणा सूर्यवंशी यांनी स्वतःवर हल्ला झाल्याचा बनाव रचल्याचा संशय पोलिसांच्या तपासातून समोर आल्याचे सांगितले जात आहे. स्वतःला पोलीस संरक्षण मिळविण्यासाठी किंवा अन्य वैयक्तिक स्वार्थ साधण्यासाठी हा कथित कट रचण्यात आला होता का, या दिशेने तपास सुरू असल्याची माहिती आहे.
दरम्यान, राणा सूर्यवंशी हे रुग्णालयातून फरार झाल्याची चर्चा असली, तरी त्यांनी डिस्चार्ज घेतला असल्याचेही सांगण्यात येत आहे. त्यामुळे त्यांच्या रुग्णालयातून जाण्याबाबत पोलिसांकडून अधिकृत माहिती मिळणे आवश्यक आहे. त्यांना डिस्चार्ज देण्यात आला, की ते पोलिसांच्या चौकशीपूर्वीच निघून गेले, याबाबत अद्याप स्पष्टता नाही.





